मुंबई : राज्यातील कोविड 19 (Covid) परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतला आहे. काळजी करण्याची गरज नाही. कारण नव्या कोविड केसेसमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आम्ही 12-15 आणि 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करत आहोत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र लिहिले आहे. कोरोना रुग्णवाढीने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. त्यात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मास्कसक्ती (Mask) पुन्हा होण्यावर सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांना विचारले असता, काळजी करण्याचे काण नसल्याचा टोपे यांचा आश्वासक सूर दिसून आला.
राज्यातील आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मंगळवारी (19 एप्रिल) 127 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 7,876,041 इतकी झाली आहे. तीन दिवसांनंतर राज्यात कोरोनामुळे मंगळवारी तीन रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोना बळींची संख्या ही 1,47,830 इतकी झाली आहे. सोमवारी (18 एप्रिल) रोजी राज्यात 59 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते.
I’ve held a detailed review of COVID19 situation in the state. There is no need to worry as there has not been a significant rise in cases. The situation is completely under control. We are vaccinating those in the 12-15 & 15-18 age groups: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/180nwiRVgV
— ANI (@ANI) April 20, 2022
राजधानी नवी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग काळजी करायला लावणारा आहे. मंगळवारी 24 तासात 632 नवे कोरोना रुग्ण दिल्लीत आढळून आले आहेत. तर सोमवारी 501 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे दिल्लीत 26 टक्क्यांनी रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. तसेच संसर्ग वाढण्याचे प्रमाणही चिंताजनक असल्याचे दिसत आहे.