योगेश बोरसे, पुणे : रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा एक आदेश अन्न व औषध प्रशासनाने काढला आहे. यामध्ये रुग्णालयाच्या संलग्न असलेल्या मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. इतकंच काय तर रुग्णालयात निदर्शनास पडेल अशा ठिकाणी त्याबाबतचा फलक लावावा असे आदेशात म्हंटले आहे. एकूणच अन्न व औषध प्रशासनाने आदेशीत केलेल्या सुचनांमुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा फायदा होणार आहे. अनेकदा रुग्णालयाच्या संलग्न असलेल्या दुकानातूनच औषध खरेदी करण्याची सक्ती करतात त्यामुळे चढया किमतीने औषधे खरेदी करण्याची नामुष्की ओढवत असते. होलसेलमध्ये ओळखीने औषधे खरेदी केल्यास मोठी तफावत जाणवत असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आरोग्य क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे.
पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यु काळे यांनी नुकतेच आदेश काढून औषध खरेदी करण्यासाठी रुग्णालय सक्ती करू शकत नाही असा निर्वाळा केला आहे.
रुग्णालयाशी संलग्न असलेल्या दुकानातून अनेकदा जास्त दराने औषध खरेदी करण्याची वेळी येते, रुग्णालय देखील त्याबाबत तगादा लावत असते.
दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने नुकतेच आदेशाचे पत्रक काढून रुग्णालयाला सूचना केल्याने आता रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबाला औषध खरेदीची सक्ती करता येणार नाहीये.
अन्न व औषध प्रशासनाने रुग्णालयांना आदेशीत करत असतांना औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याचा संदर्भ देऊन हा दाखला दिला आहे.
एकूणच या निर्णयामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे, त्यादृष्टीने रुग्णालयात देखील याबाबत एक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
दरम्यान, या आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आल्याने आरोग्य वर्तुळात या आदेशाचीच जोरदार चर्चा आहे.