मुंबई : पत्राचाळ जमिन घोटाळा प्रकरणी (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांची चौकशी सुरु असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. हे सर्व सुरु असतानाच दुसरीकडे (ED Mumbai) मुंबईत ईडीकडून ठिकठिकाणी छापेमारी ही सुरुच आहे. राऊतांच्या कारवाईनंतर आतापर्यंत तीनवेळेस (Raid) छापेमारी झाली आहे. बुधवारी सकाळपासून शहरातील विविध ठिकाणी ईडी कडून छापेमारी सुरु होती. त्यामुळे आता नंबर कुणाचा? अशी स्थिती असतानाच ईडीच्या रडावर मुंबईतील बिल्डर असणार हे स्पष्ट झाले आहे. कारण बुधवारी दुपारी ईडीने मुलूंडमधील श्रद्धा डेव्हलपर्सवर धाड टाकली होती. यामध्ये नेमके काय समोर येणार ते आता पहावे लागणार आहे. शिवाय चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या राऊंताचा याच्याशी काय संबंध आहे का? हे देखील पहावे लागणार आहे.
संजय राऊत हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. शिवाय गोरेगाव येथील पत्राचाळ जमिन घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी ही सुरु आहे. मात्र, ईडीकडू आतमध्ये चौकशी आणि बाहेर शहरात धाडी असे चित्र आहे. बुधवारी श्रद्धा डेव्हलपर्सवर टाकण्यात आलेली धाड ही राऊतांशीच संबधित असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. या डेव्हलपर्सचे अनेक प्रोजेक्ट हे सुनील राऊत यांच्या मतदार संघात आहेत. त्यामुळे राऊतांचा पाय आणखी खोलात जाणार का अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. राऊतांवर कारवाई झाल्यानंतरची ही तिसरी छापेमारी आहे. यावेळी मात्र, श्रद्धा डेव्हलपर्सवर छापे टाकण्यात आला आहे.
श्रद्धा डेव्हलपर्स हे मुलूंडमधील असून त्यांचे विक्रोळीत विविध प्रोजेक्ट हे सुरु आहेत. बुधवारी दुपारी या डेव्हलपर्सच्या कार्यालयात ईडीचे अधिकारी हे दाखल झाले होते. त्यांनी कागदपत्रांची तपासणीही सुरु केली होती. त्याच अनुशंगाने त्यांचे विक्रोळीत विविध प्रोजक्ट सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई एका डेव्हलपर्सवर झाली असली त्याचा संबंध राऊतांशी असल्याचे सांगितल्याने त्यांच्या अडचणीत भर पडणार हे पहावे लागणार आहे.
पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर ईडीने मुंबईतील दोन ठिकाणी हे सर्च ऑपरेशन केले होते. त्यानंतर तिसऱ्या वेळी मात्र श्रद्धा डेव्हलपर्सवर धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये काही महत्वाची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागलेली होती. त्यानंतर आज पुन्हा ईडीकडून छापेमारी सुरु झालीी आहे. यामध्ये काय माहिती समोर येते आणि यामध्ये आणखी कोणाचा समावेश असणार हे देखील समजले जाईल. परंतु, बुधवारी दुपारपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती सांगण्यात आलेली नव्हती.