१२० देशांना मागे टाकून मुंबई झाली ‘ग्रीन सिटी ऑफ द वर्ल्ड’

| Updated on: Jan 09, 2023 | 2:15 PM

Green City Award : जागतिक मान्यता असलेल्या अमेरिकेतील युनायटेड नेशन्स फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन संस्थेचे हे नामांकन मिळाल्याने मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

१२० देशांना मागे टाकून मुंबई झाली ग्रीन सिटी ऑफ द वर्ल्ड
MUMBAI CITY
Follow us on

मुंबई : अमेरिकेतील युनायटेड नेशन्स फूड अँड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये जगातील 120 देश सहभागी झाले होते. एका वर्षात किती झाडे लावली, 3 वर्षात लावलेल्या झाडांची सदय स्थिती, नागरिकांचा सहभाग, पालिका अधिकारी आणि संस्था यांचा सहभाग या सर्वेक्षणात तपासण्यात आला.

शहरात असलेल्या चिमण्यांची संख्या, बायोडायव्हरसिटी, ट्री बोर्ड आणि बजेट या सर्वेक्षणात तपासण्यात आले. यात देशातील मुंबई आणि हैदराबाद ही दोन शहरे अव्वल ठरली. यापुर्वी हैदराबाद शहराला इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ हॉर्टिकल्चर प्रोड्युसर्स (एआयपीएच) या संस्थेचा वर्ल्ड ग्रीन सिटी हा किताब जिंकला होता.

2022 मध्ये दक्षिण कोरियातील जेजू येथे हैदराबाद शहराला हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी हैदराबादची एकूण 18 शहरांशी स्पर्धा होती. मात्र, अमेरिकेच्या युनायटेड नेशन्स फूड अँड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन संस्थेच्या सर्वेक्षणामध्ये 120 देश सहभागी झाले होते.

हे सुद्धा वाचा

ऑर्गनायझेशनच्या नियमावलीत मुंबई आणि हैदराबाद ही दोन्ही शहरे बसली. त्यात मुंबई सरस ठरली. मुंबईची मियावाकी जंगले आणि वृक्षारोपण झालेल्या 3 लाखांहून अधिक झाडे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. त्यासोबत हैदराबादमधील हिरवाईही आकर्षक ठरली. ऑर्गनायझेशनच्या नियमावलीतील नियमांची पुर्तता करत मुंबईने ‘ग्रीन सिटी ऑफ द वर्ल्ड’ पुरस्कार मिळविला.

ग्रीन सिटी ऑफ द वर्ल्डच्या असलेल्या मॅगेझिनमध्ये महापालिकेच्या उद्यान विभागाची धुरा संभाळणारे अधिक्षक जितेन्द्र परदेशी यांचा माहितीपर लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.