नव्या सरकारचा महाशपथविधी सोहळा, लाडक्या बहिणींना रेड कार्पेट, 22 राज्यांचे मुख्यमंत्री येणार; असा होणार सोहळा

| Updated on: Dec 02, 2024 | 4:48 PM

येत्या पाच तारखेला नव्या सरकाराच शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.

नव्या सरकारचा महाशपथविधी सोहळा, लाडक्या बहिणींना रेड कार्पेट, 22 राज्यांचे मुख्यमंत्री येणार; असा होणार सोहळा
mahayuti
Follow us on

विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीनं राज्यात तब्बल 230 जागा जिंकल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाला मिळून केवळ पन्नास जागाच मिळाल्या, सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान आता येत्या पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.

 असा होणार सोहळा

नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री देखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. तब्बल 22 राज्याचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत येणार आहेत. विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना या सोहळ्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आलं आहे. लाडक्या बहिणींना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.  नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल 40 हजार लोकांची उपस्थिती असणार आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स  

दरम्यान येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे, मात्र अजूनही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरला त्यामुळे राज्यात आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे, मात्र महायुतीमधून अजून कोणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या आमदारांनी आपल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली आहे. मात्र अजूनही भाजपकडून गटनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. गटनेता निवडीची जबाबदारी भाजपकडून निर्मला सीतारामन आणि विजय  रुपाणी यांच्यावर सोपावण्यात आलेली आहे. चार तारखेला भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार असल्याची माहिती समोर येत आहे.