“रोहित पवार, राजेश टोपेंसारखे 50 उमेदवार आम्ही पाडणार”, लक्ष्मण हाकेंनी सांगितला मास्टर प्लॅन, म्हणाले “जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना…”

| Updated on: Oct 02, 2024 | 1:35 PM

ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत तुम्हाला दिसणार आहे. आता लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढणार आहे", असेही लक्ष्मण हाकेंनी म्हटले.

रोहित पवार, राजेश टोपेंसारखे 50 उमेदवार आम्ही पाडणार, लक्ष्मण हाकेंनी सांगितला मास्टर प्लॅन, म्हणाले जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना...
Follow us on

Laxman Hake On Vidhansabha Election : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध बैठका होत आहेत. तर दुसरीकडे काही छोट्या मोठ्या पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणाही केल्या जात आहेत. त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठा मास्टरप्लॅन आखला आहे. येत्या निवडणुकीत रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार आम्ही पडणार असे विधान लक्ष्मण हाके यांनी केले.

ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावे

लक्ष्मण हाके यांनी नुकतंच नागपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासह निवडणुकांबद्दलही भाष्य केले. “विदर्भातील ओबीसी नेत्यांना विनंती आहे की हैदराबाद गॅजेट असेल किंवा इतर बाबतीतून ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री घालवतील. ओबीसी आरक्षणाची अजूनही गरज आहे. सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावे. विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही”, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

“50 उमेदवारांना पाडणार”

“मी ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय. ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय. माझ्यावर हल्ला होण्यापूर्वी मते या तरुणाचे फोटो अनेक नेत्यांसोबत आहेत त्याच्यावर कारवाई करावी. आम्ही आजपासून 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार करत आहे. आता आम्ही 50 उमेदवार निवडून आणण्याची यादी लवकरच तयार करू. येत्या विधानसभा निवडणुकीला आम्ही 50 उमेदवार पाडायचे हे ठरवलं आहे. ज्यांनी जरांगे यांना मदत दिली, रसद पुरवली त्यांना आम्ही पडणार. आम्ही रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारख्या उमेदवारांना पाडणार”, असेही लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

ओबीसीची भूमिका घेणारे तरुण विधानसभेत

“विदर्भातील ओबीसी नेतृत्वाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. नेतृत्व पुढे यायला लागले तर दुय्यम वागणूक मिळते. ओबीसींना यांच्या तुकड्यावर जगू नये. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत तुम्हाला दिसणार आहे. आता लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढणार आहे”, असेही लक्ष्मण हाकेंनी म्हटले.

“शिंदे समिती बेकायदा समिती आहे. मराठा समाज गरीब असू शकतो, मात्र ओबीसी आरक्षणामुळे मराठा गरीब कसा असू शकतो. देवेंद्र फडणवीस म्हणतात एक लाख रोजगार मराठा तरुणांना दिले आहे. मग एक लाख मराठा तरुणांची माथी भडकवण्याचे काम एकनाथ शिंदे, रोहित पवार करत आहेत. फडणवीसांना टार्गेट करण्यात येते, फडणवीसांनी याचे ऑडिट करावे. शरद पवारांना मतं मागण्यासाठी दुसरे काही कारण उरले नाही”, असा आरोपही लक्ष्मण हाकेंनी केला.