पुणे : अजब-गजब कारणांमुळे पुणे नेहमी चर्चेत असतं. आता पुणे चर्चेत आले आहे ते कोर्टाने काढलेल्या अजब फतव्यामुळे. महिला वकिलांनी कोर्टात केस बांधल्याने कामात अडथळा येत असल्याची नोटीस कोर्टाने काढली आहे. या नोटीसची प्रत सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अजब फतवा पाहून पुण्यातील महिला वकिल चांगल्याच संतापल्या आहेत. पुणे जिल्हा न्यायालयाकडून हा अजब फतवा काढण्यात आला आहे. महिला वकिलांना सूचना करणारा हा फतवा आहे.
महिलांनी न्यायालयात केस बांधल्याने न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो असा दावा या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी हा आदेश आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यानंतर या आदेशाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
महिला वकील अनेकदा न्यायालयामध्ये केस बांधतात किंवा वेणी घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोर्टात केस बांधल्याने न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचा दावा या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
महिला वकिलांनी यापुढे न्यायालयात केस बांधने टाळावे अशी सूचना देखील या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आली आहे. पुणे जिल्हा न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून हा आदेश जारी करण्यात आल्याचे दिसत आहे.
या आदेशावर 20 ऑक्टोबर 2022 अशी तारीख आहे. वकील इंदिरा जयसिंग यांनी नोटिशीचा फोटो शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
महिला वकिलांमुळे कोण विचलित होत आहे आणि का? असा सवाल त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. नोटीसचा फोटो व्हायरल झाल्यानंतर पुणे बार असोसिएशनने अशी कोणतीही नोटीस लावण्यात आली नसल्याचे म्हंटले आहे. तर, आक्षेपानंतर लगेचच हू नोटीस मागे घेण्यात आली असल्याचे बार अँड बेंचचे वृत्त आहे.
Wow now look ! Who is distracted by women advocates and why ! pic.twitter.com/XTT4iIcCbx
— Indira Jaising (@IJaising) October 23, 2022