Video : चंद्रपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्याने टाकली आक्षेपार्ह पोस्ट; भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशी दिली शिक्षा

| Updated on: Feb 12, 2022 | 5:56 AM

भाजप कार्यकर्त्यांनी त्याला चांगलेच झापले. त्यानंतर माफी मागायला लावली. उठबशा काढायला लावल्या. राकेश कुर्झेकर यांनी माफी मागितली. उठाबशाही काढल्या.

Video : चंद्रपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्याने टाकली आक्षेपार्ह पोस्ट; भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशी दिली शिक्षा
पोलीस ठाण्यात उठाबशा करताना काँग्रेसचा कार्यकर्ता.
Follow us on

चंद्रपूर : पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते नागपुरात आमनेसामने आले. असाच एक प्रकार चंद्रपुरातही घडला. चंद्रपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला उठाबशा करायला लावल्या. कारण त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याबद्दल फेसबूकवर पोस्ट टाकली. ही आक्षेपार्ह पोस्ट (Offensive post) पाहून भाजपचे कार्यकर्ते संतापले. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनमध्ये उठबशा काढायला लावल्या. राकेश कुर्झेकर (Rakesh Kurzekar) असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याने काल पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.

उठाबशा करायला लावल्या

फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर राकेशला ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये बोलाविण्यात आले. त्याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते एकत्र आले होते. काँग्रेसचा कार्यकर्ता घाबरला. भाजप कार्यकर्त्यांनी त्याला चांगलेच झापले. त्यानंतर माफी मागायला लावली. उठबशा काढायला लावल्या. राकेश कुर्झेकर यांनी माफी मागितली. उठाबशाही काढल्या. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात तक्रार दिली नाही. राकेशने भीतीपोटी भाजपचे कार्यकर्ते म्हणत होते, तसे केले. त्यामुळं त्याला माफ करण्यात आले. यापुढं असं करायचं नाही, अशी समज देण्यात आली.

फेसबूकवर पोस्ट टाकताना करा विचार

फेसबूकचा वापर चांगल्या कामासाठीही करता येऊ शकतो. पण, तो कसा करायचा हे ज्याचे त्याच्यावर अवलंबून आहे. जो चांगला वापर करेल, त्याला चांगला रिस्पान्स मिळेल. जो वाईट वापर करेल, त्याचे फळ त्याला भोगावेच लागले. फेसबूक हे व्यक्त होण्याचे समाजमाध्यम आहे. याचा अर्थ आपण कुणाही व्यक्तीविरोधात काहीही लिहिले, बोलले चालेल, असं नाही. संबंधिताने तक्रार केल्यास सायबर क्राईमअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळं कोणतीही पोस्ट टाकताना ती कुणाच्या विरोधात तर नाही ना. याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा विचार करणे गरजेचे आहे. उताविळ काँग्रेसच्या कार्यकर्त्याला माफ केले म्हणून बरे झाले. अन्यथा त्याला पोलिसांच्या गुन्ह्याला सामोरे जावे लागले असते.

गोंदियात धावती ट्रेन पकडता पकडता तोल सुटला; महिला पडणार एवढ्यात जवान आला मदतीला धावून…

Nagpur NMC | मनपाच्या स्थायी समितीकडून यंदाही करवाढ नाही, प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला

Nagpur Crime | एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले; चाकूच्या धाकावर 58 वर्षीय महिलेवर दोघांकडून बलात्कार, नागपुरात चाललंय काय?