नागपूर : नागपुरातील एका 66 वर्षीय वृद्धाला लंडनच्या महिलेने 10 लाखांचा गंडा घातलाय. फेसबुकवर मैत्री करणं संबंधित वृद्धाला चांगलंच महागात पडलंय. भारतात गिफ्ट घेऊन येण्याच्या उद्देशून कस्टम अधिकाऱ्यांनी अडवल्याची थाप मारुन लंडनच्या महिलेने 9 लाख 85 हजार रुपये उकळले. (Old man from Nagpur cheated by a woman in London Through Facebook)
अनिल वसंत मुलावकर असं फसलेल्या वृद्धाचं नाव आहे. नागपूरच्या लक्ष्मीनगर भागात ते राहतात. ऑक्टोबर 2010 मध्ये घडलेल्या या बनवाबनवी प्रकरणात बजाजनगर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केलाय.
वर्षभरापूर्वी त्यांना लिडा थॉमसन (लंडन) हिची फेसबुकवर रिक्वेस्ट आली. ती अॅप्सेट केल्यानंतर मुलावकर बाबा आणि लिडा फेसबुकवर एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. जेव्हा संपर्क वाढला तेव्हा कोरोनाचा ऐन पिरीएड सुरु होता.
कोरोना संसर्गात भारतात सेवा कार्यासाठी येण्याची इच्छा असल्याचं सांगत 7 ऑक्टो. 2020 ला दिल्ली एअरपोर्टवर उतरले पण मला कस्टम अधिकाऱ्यांनी अडवलं आहे. तसंच कस्टम अधिकाऱ्यांनी 9 लाख 85 हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याशिवाय तुम्हाला सोडणार असल्याचं लिडा हिने मुलावकर यांना सांगितले. जर रक्कम जमा केली नाही तर आपल्याजवळील कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त केली जाईल, अशी थापही लिडाने मुलावकर यांना मारली.
तिच्या थापांना बळी पडून मुलावकर बाबांनी काही टप्प्यांत ही रक्कम भरलीही परंतु तिची पैशांची मागणी वाढत गेली. त्यानंतर मुलावकर बाबांनी पैसे देण्यास ठाम नकार दिला. त्यानंतर लिडाने संपर्क तोडून टाकला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी नागपूच्या पोलिस स्थानकामध्ये तक्रार दिली आहे.
(Old man from Nagpur cheated by a woman in London Through Facebook)
हे ही वाचा :
संतापजनक ! अल्पवयीन मुलीचं अपहरण, नंतर सलग आठ दिवस सामूहिक बलात्कार, नराधम अटकेत
अहमदनगरच्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा, महिलेचे शिर उडवून बालकाला संपवणारा सापडला