महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित, किती घाबरायला हवं? किती गंभीर? आरोग्यमंत्री टोपे म्हणतात..

| Updated on: Dec 03, 2021 | 4:36 PM

ओमिक्रॉनबाबत राज्यात पूर्णपणे खबरदारी घेतली जात असून मुंबई विमानतळावर आतपर्यंत 800 जणांची RTPCR चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.अलीकडच्या एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित, किती घाबरायला हवं? किती गंभीर? आरोग्यमंत्री टोपे म्हणतात..
राजेश टोपे, आरोग्य मंत्री.
Follow us on

जालना : शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकात ओमिक्रॉनची (Omicron) लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. अशावेळी महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) मोठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळावर आतापर्यंत 800 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

ओमिक्रॉनबाबत राज्यात पूर्णपणे खबरदारी घेतली जात असून मुंबई विमानतळावर आतपर्यंत 800 जणांची RTPCR चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.अलीकडच्या एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कर्नाटक सीमेवर सध्या कोणतेही निर्बंध घातले जाणार नाही. केंद्र सरकार घेईल त्या निर्णयाप्रमाणे राज्य निर्णय घेईल असं टोपे म्हणाले. याशिवाय नागरीकांनी काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

28 नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले

मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात 12 तर पुण्यातील लॅबमध्ये 16 असे एकूण 28 नमुने जिनोमिक सिक्वेसिंग साठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल अजून आले नाहीत. त्यामुळे या नमुन्यांचे अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणार नसल्याचंही टोपे म्हणाले.

ओमिक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण कमी

कर्नाटकमध्ये ओमिओक्रॉनचे दोन रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी एका रुग्णाला सुट्टी देण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचं ते म्हणाले. आतापर्यंत जगातील 30 पेक्षा अधिक देशात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण कमी आहे. राज्यातील नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे. तसेच सरकारने केलेले नियम पाळावेत, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे. रशियाहून अंबरनाथमध्ये आलेली 7 वर्षाची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. जर ही मुलगी पॉझिटिव्ह आढळून आली असेल तर तिच्या संपर्कात कुणीही न राहता तिला आयसोलेट केलं जाईल असं टोपे म्हणाले.

1 नोव्हेंबरनंतर राज्यात आलेल्या विमान प्रवाशांचं सर्वेक्षण सुरु

अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातील आगीच्या घटनेचा अहवाल अजूनही आलेला नाही. हा अहवाल देण्यासंदर्भात मी विनंती करीन, तेथील कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याच कारण नाही, असंही टोपे म्हणाले. ऑक्सीजन अभावी राज्यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. 1 नोव्हेंबरनंतर राज्यात आलेल्या विमान प्रवाशांची यादी घेण्यात आली आहे. त्यांचं सर्व्हेक्षण करण्याचं काम सुरू असून त्यांच्या संपर्कात आळलेल्याची तपासणी सुरु असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Devendra fadnavis : राजकारणात कुणाला घाबरत नाहीत पण इथे फडणवीस घाबरले

MNS: मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक