दत्ता कानवटे, औरंगाबाद : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आय लव्ह यू देवेंद्रजी असं म्हंटलं तर फार चर्चा झाली नसती. पण राज्यातील नेहमीच चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल स्तुतीसुमणं उधळत आय लव्ह देवेंद्रजी असं म्हंटलं आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असतांना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत हे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या बद्दलमला आदर असंही सदावर्ते यांनी म्हंटले आहे.
स्वतंत्र मराठवाड्याची घटनाकर्त्याना कुणकुण होती, मराठवाडा स्वतंत्र राज्य पाहिजे ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ठाम भूमिका होती, पण केंद्रीय आसक्तीतून मराठवाड्यावर अन्याय झाला.
मराठा संघटनांच्या एका दुक्का विरोधाला मी महत्व देत नाही पण स्वतंत्र मराठवाडा हा जातीय लढा नाही, बेळगाव हे भारतात आहे, पाकिस्तान बॉर्डरवर नाही, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटलं आहे.
शरद पवार हे देशाच्या नेतृत्वाच्या लायकीचे नाहीत, काँग्रेसने बेळगाव प्रश्नी माफी मागितली पाहिजे कारण त्यांनी आमच्या मताच्या विरोधात पाकिस्तान दिलं आहे असाही आरोप सदावर्ते यांनी केला आहे.
जसं आता सर्वांसाठी काश्मीर खुलं झालं आहे अगदी तसं पाकिस्तान परत घेतला पाहिजे, सीमा भागातील गावांची आम्ही सीमा प्रश्नी सरपंच परिषद घेणार आहेत, हिंदुस्थानी म्हणून आपण एकत्र राहील पाहिजे.
सुषमा अंधारे या शरद पवार यांनी शिवसेनेत पेरलेल्या व्यक्ती आहेत, या देशात लाईन ऑफ कंट्रोल नाही सीमा भागातील लोकांना जिकडे राहायचं तिकडं राहू दिलं पाहिजे असेही मत सदावर्ते यांनी मांडले आहे.
राज्यपालांनी पी व्ही नृसिंह राव यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचे निमंत्रण नाकारले ही स्वागत करण्यासारखी बाब आहे, कारण पी व्ही नृसिंह राव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, नृसिंह राव शरद पवार हे आदर्श असू शकत नाहीत
आमच्या घरात गाढव माझ्या मुलीने पळाले आहे, त्याचं नाव मॅक्स आहे. आणि गाढवाचे दूध पोटदुखीवर औषध आहे त्यामुळे मुलीने ते पाळलं आहे असेही या मुलाखतीत म्हंटलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे देश पातळीवरील मोठे नेते आहेत. ते मला आवडतात आय लव्ह देवेंद्रजी असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांचे डंके की चोट पर विलीनीकरण होणार आहे असाही दावा सदावर्ते यांनी म्हंटलं आहे.