नाशिक : माणूस कितीही मोठ्या पदावर गेला तरी तो जुन्या आठवणींना विसरू शकत नाही. त्यात कष्टाचे दिवस असतील तर अजिबातच नाही. काही कार्यक्रम किंवा काही निमित्त असले की जून दिवस आठवतात. त्याची चर्चा होते. कधी-कधी माणूस त्या आठवणींना उजाळा देत असतांना त्याचे डोळेही भरून येतात. त्यामुळे जून दिवस माणसाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे असतात. आणि त्याचमुळे एखाद्या मोठ्या पदावरील व्यक्ती पूर्वी केलेल्या कार्यामुळे चर्चेत येत असतो. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्वी रिक्षा चालवत होते. ठाण्यातील विविध भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षा चालविल्याचे अनेक किस्सेही सांगितले जातात. रिक्षा चालवून एकनाथ शिंदे आपला उदरनिर्वाह करत होते.
एकनाथ शिंदे दिवसरात्र मेहनत करत होते. रिक्षा चालवत असतांना सर्वसामान्य व्यक्तींना मदत करत होते, शिवसेनेत असतांना नगिरकांच्या मदतीला धावूनही जात होते.
अशा विविध आठवणी एकनाथ शिंदे यांच्या बाबत सांगितल्या जातात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला असे म्हणत एकनाथ शिंदे यांचे आजही कौतुक केले जातं.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही आता अशीच काहीशी चर्चा होऊ लागली आहे. 9 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध शहरात कार्यक्रम पार पडतील. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी होईल. सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊसही पडेल.
याच काळात त्यांचा संघर्ष सांगितला जाईल, त्यांनी रिक्षा चालवत केलेला संघर्षही सांगत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत त्यांच्याबद्दल लिहिलं जाईल आणि शुभेच्छा दिल्या जातील.
मात्र, नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची चर्चा आत्तापासूनच होऊ लागली आहे. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आगळ्या-वेगळया स्पर्धेचे आयोजन केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे आयोजन @mieknathshinde @CMOMaharashtra #happybirthday #EknathShinde pic.twitter.com/nSolMxM1Zv
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) February 4, 2023
नाशिक शहरातील रिक्षा चालकांसाठी रिक्षा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामध्ये पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहे, याशिवाय एक लाख रुपयांचे विमा कवचही दिले जाणार आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 21 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला 11 हजार रुपये, तृतीय क्रमांकाला 7 हजार रुपये, चतुर्थ क्रमांकाला 5 हजार आणि पाचव्या क्रमांकाला 2 हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
बाळसाहेबांची शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रिक्षाचालक यांच्याकडून रिक्षा सजावट करण्याची लगबग सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्तासुंदरी मिळाली असली तरी या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्या स्वप्नसुंदरीची म्हणजेच रिक्षाची आठवण त्यांना नक्की येणार आहे.