गडचिरोली : नक्षलग्रस्त (Naxal-affected)आणि अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात राज्य राखीव दल, पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक होत असते. मात्र यावेळी झालेल्या गोळीबार नक्षलवाद्यांमध्ये नसून तो राज्य राखीव दलाच्या (State Reserve Force) जवानाने दुसऱ्या एका जवानावर केला आहे. राज्य राखीव दलाच्या एका जवानाने दुसऱ्या जवानाची हत्या (Murder) केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे यानंतर त्या जवानाने स्वतः ही आत्महत्या केली आहे. त्यामुळे सध्या राज्य राखीव दलात खळबळ उडाली असून ही घटना अंतर्गत वादातून घडल्याचे म्हटले जात आहे. तर ज्याने हत्या केली त्या जवानाचे नाव श्रीकांत बेरड असून मृत जवानाचे नाव बंडु नवतर असे आहे. याबाबत मारपल्ली पोलीसांना माहिती दिली असून पोलिस तपास करत आहेत.
याप्रकरणी मारपल्ली पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गडचिरोली जिल्हा अहेरी तहसीलमध्ये मारपल्ली पोलीस स्टेशन आहे. याच्या हद्दीत राज्य राखीव दलाच्या जवान आहेत. त्यातील श्रीकांत बेरड आणि बंडु नवतर या जवानांमध्ये अंतर्गत वाद होता. तो आज उफाळून आला. त्यानंतर रागाच्या भरात जवानाचे नाव श्रीकांत बेरड याने बंडु नवतर यांच्यावर गोळ्या झाडल्या ज्यात जवान बंडु नवतर हे मृत झाले आहेत.
दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे जवान श्रीकांत बेरड याने जवान बंडु नवतर याला गोळ्या घालुन हत्या केल्यानंतर जवान श्रीकांत बेरड याने स्वतः ही आत्महत्या केली आहे. त्यामुळे सध्या राज्य राखीव दलात खळबळ उडाली असून ही घटना अंतर्गत वादातून घडल्याचे म्हटले जात आहे.
तर याच्या आधी 28 जानेवारी 2022 हिंगोलीमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली झाली होती. दिनेश बाळासाहेब मुलगीर असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव होते. तर ते हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलातील बल गट क्रमांक 12 येथे कार्यरत होते. तसेच दिनेश हे गडचिरोली जिल्ह्यातील राजाराम खंडाला विभागामध्ये कर्तव्यावर होते.