हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात (Hingoli) अपघाताचे (Accident) प्रमाण वाढले आहे. पुन्हा एकदा एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. दोन चारचाकी वाहनाच्या (Car Accident) समोरासमोर झालेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हिंगोली- औढा नागनाथ मार्गावर असलेल्या लिंबाळा परिसरात हा अपघात घडला आहे. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात एक महिला ठार झाली. अन्य दोन महिला देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीने हिंगोलीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये वाहनाच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला आहे. वाहनांची अवस्था बघूनच या अपघाताची कल्पना येते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला आहे. समोरून येणारी चारचाकी भरधाव वेगात असल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात हिंगोली- औढा नागनाथ मार्गावर असलेल्या लिंबाळा परिसरात घडला आहे. समोरून येणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. शोभा दरक 45 असं मृत महिलेचे नाव आहे. तर या अपघातामध्ये जखमी झालेल्या अन्य दोन महिलेंच्या नावांबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एक कुटुंब एका कार्यक्रमासाठी नांदेडहून हिंगोलीला गेले होते. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा नांदेडकडे परतत असताना बुधवारी रात्री आठच्या सुमारास हिंगोली- औढा नागनाथ मार्गावर दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीनही महिला गंभीर जखमी झाल्या होत्य. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने या महिलांना उपचारासाठी हिंगोलीच्या एका रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र यातील शोभा दरक यांचा रस्त्यातच मृत्यू झाला तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.