New Year Celebration : 31 ला पार्टी करताना टल्ली होण्याचा प्लान ? पण 4 पेगपेक्षा अधिक दारू मिळणार नाही..

| Updated on: Dec 27, 2024 | 10:23 AM

डिसेंबर महिना उजाडताच अनेकांना 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी अर्थात नववर्षाच्या पार्टीचे वेध लागतात. त्या दृष्टीने अनेकांचे प्लानिंगही होते. काहींचा घरातच कुटुंबिय किवा मित्र-मैत्रिणींसह सेलिब्रेशनचा प्लान असतो तर काही जण हॉटेल रिसॉर्टमध्ये जाऊन न्यू इअरचे सेलिब्रेशन करण्याचं ठरवतात.

New Year Celebration : 31 ला पार्टी करताना टल्ली होण्याचा प्लान ? पण 4 पेगपेक्षा अधिक दारू मिळणार नाही..
31 डिसेंबरची पार्टी करायच्या आधी हे नक्की वाचा
Follow us on

डिसेंबर महिना उजाडताच अनेकांना 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी अर्थात नववर्षाच्या पार्टीचे वेध लागतात. त्या दृष्टीने अनेकांचे प्लानिंगही होते. काहींचा घरातच कुटुंबिय किवा मित्र-मैत्रिणींसह सेलिब्रेशनचा प्लान असतो तर काही जण हॉटेल रिसॉर्टमध्ये जाऊन न्यू इअरचे सेलिब्रेशन करण्याचं ठरवतात. त्यापैकी अनेकांची पार्टी ही ओली, अर्थात मद्यपानाची असते. पण याच मद्यपानामुळे 31 डिसेंबर, 1 जानेवारीला अनेक दुर्घटनना किंवा अपघात होत असतात. हेच टाळण्यासाठी आता हॉटेल असोसिएशनने ३१ डिसेंबरच्या फुल नाईट पार्टीसाठी आराखडा आखत प्लानिंग केलं आहे. त्याचीच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे 31 डिसेंबरला 4 पेगपेक्षा अधिक दारू मिळणार नाही.

हे वाचून अनेकांना झटका बसला असेल, पण हे खरं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन करताना लोकांना संपूर्ण रात्र पार्टी करण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र 31 डिसेंबरच्या फुल नाईट पार्टीदरम्यान कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी हॉटेल असोसिएशनने आराखडा तयार केला आहे.

त्यानुसार, हॉटेल असोसिएशनने ग्राहकांना चार मोठे पेग दिल्यानंतर दारु न पिण्याचं आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ग्राहकांनी पार्टीदरम्यान दारूच्या नशेत असताना किंवा पार्टीवरून घरी परतताना कोणतीही चूक करू नये. 31 डिसेंबरच्या रात्री अनेक लोक दारू पिऊन सेलिब्रेशन करतात, मात्र आता हॉटेलमध्ये त्यांना 4 पेक्षा जास्त पेग मिळणार नाहीत.

तसेच कोणताही अपघात अथवा दुर्घटना होऊ नये या कारणास्तव, असोसिएशनने ग्राहकांना दारू देताना त्यांच्या वयाची पडताळणी करण्यासाठी ओळखपत्रं तपासण्याची आणि मद्यपान केलेल्या लोकांसाठी भाड्याने ड्रायव्हर देण्याची योजना आखली आहे. यामुळे अनेक दुर्घटना टळू शकतात.

हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रुम व ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले राहणार

नववषानिमित्त खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रुम व ऑर्केस्ट्रा बार यांना 31 डिसेंबर, 2024 रोजी दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जनरल सेक्रेटरी, इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन यांनी दिनांक 10.12.2024 रोजीच्या पत्रान्वये शासनास ही विनंती केली होती.