वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील सरपखेड, धोडप बुद्रुक, लेहणी, डोणगाव या आंतरजिल्हा मार्गाची खड्ड्यांमुळं चाळण झाली असून अवकाळी पावसाने (unseasonal rain) या मार्गावरील खड्यांत पाणी साचल्याने वाहन चालकांना (maharashtra news)गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागतं आहे. मागील 10 वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्यानं अनेकांना पाठीचे आणि मणक्यांचे आजार जडले आहेत. या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा संबंधित विभागाकडे केली आहे. मात्र अद्याप मार्गाची दुरुस्ती करण्यात न आल्याने रुग्ण, वृध्द आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अनेकदा प्रकार दाखल करुनही प्रशासन दखल घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यातील आगामी खरीप हंगामामध्ये सर्वाधिक 3 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर इतर 1 लाख हेक्टरवर तुर, कपाशी, ज्वारी सह इतर पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. खरिपाच्या पेरणीसाठी सोयाबीन, तूरीच्या घरगुती बियाण्याची उगवण क्षमता वाढावी आणि त्यापासून चांगले उत्पन्न मिळावे. यासाठी घरगुती बियाण्याची उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रियेच प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन जिल्ह्यातील साखरासह अनेक ठिकाणी कृषी विभागाकडून देण्यात आले आहे. बियाणांची उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रियेच जिल्ह्यातील 4 हजार 700 महिला बचत गट आणि समूहांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात दोन दिवस अगोदर झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे सरपखेड, धोडप शिवारातील उच्च दाब वाहिनीचे अनेक खांब कोसळल्याने वीज, शेती वीज पंपांचा पुरवठा खंडित झाला होता. मोठ्या प्रमाणात खांब पडून वीज तारा आणि साहित्य तुटून महावितरण चे मोठे नुकसान झाले आहे. हे कोसळलेले खांब बदलन्याचे काम सुरू असून लवकरच खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महवतीरण कडून देण्यात आली आहे.