उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला ढोकी येथील (Farmers Labours Demand To Reopen Terna Sugar Factory) तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करावा, या मागणीसाठी शेतकरी, सभासद आणि कामगार एकवटले आहेत. तेरणा कारखाना बचाव संघर्ष समितीच्या वतीने 22 फेब्रुवारीपासून पाच दिवसांचे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतर 27 फेब्रुवारीला ढोकी येथे रास्ता रोको तर 28 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे (Farmers Labours Demand To Reopen Terna Sugar Factory).
तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी सर्व शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना भेटणार आहेत. 2007 पासून हा कारखाना बंद असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेसह शेतकरी सभासद यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
शासनाने जिल्हा मध्यवर्ती बँकेस घेतलेली 155 कोटींच्या थकहमी पैकी 16 कोटी रुपये दिल्यास भविष्य निर्वाह निधी कार्यलयाने कारखान्यास लावलेले सील निघून जाईल त्यामुळे कारखाना भाडेतत्वावर देण्यासह निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास आंदोलक शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकारने कारखाना सुरु व्हावा यासाठी पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
तेरणा बचाव संघर्ष समितीमध्ये बिगर राजकीय सभासद शेतकऱ्यांचा समावेश असून हे 36 हजार शेतकरी आणि सभासद यांचे हक्क अबाधित ठेवून कारखाना भाडेतत्वावर देण्यास सकारात्मक आहेत. मराठवाड्यातील सर्वात पहिला सहकारी क्षेत्रातील जुना असलेला उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या 13 वर्षापासून बंद आहे.
हा कारखाना सुरु करण्यासाठी केवळ तीस कोटी रुपये निधीची आवश्यकता असून शासनाने थकहमी घेऊन तो सुरु करावा, अशी मागणी तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने ॲड. अजित खोत, संग्राम देशमुख, निहाल काझी, रवी गरड, गफार रशिद काझी, सतीश देशमुख, अमोल समुद्रे, अनंत देशमुख, राहुल वाकुरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
तेरणा शेतकरी सहकारी कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे तर शेतकरी ऊस उत्पादन घटल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. तेरणा कारखान्याची जवळपास 400 एकर इतकी जमीन असून ती विकण्यास सभासदांचा तीव्र विरोध आहे. तर, कारखाना बंद असल्याने मशीनरी धूळखात पडून असून भंगार चोरीच्या घटना वाढत आहेत. कारखान्यावरील कर्ज व व्याजाचा डोंगर एकीकडे वाढत असताना कारखाना बंद असल्याने मशिनरी आणि इतर बाबींचे मूल्यांकन कमी होत आहे (Farmers Labours Demand To Reopen Terna Sugar Factory).
तेरणा कारखान्यावर एकेकाळी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आणि त्यानंतर शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, कर्जबाजारीपणामुळे आणि राजकीय कुरघोड्यामुळे हा कारखाना अखेर बंद पडला आहे. डॉ. पाटील परिवाराच्या भाजप प्रवेशानंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली असून शेतकऱ्यांची लक्ष्मी असलेला हा कारखाना सुरु होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची आणि सरकारची सकारात्मक इच्छाशक्ती गरजेची आहे.
अतिवृष्टीच्या पाहणीवेळी शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात दौरा केल्यानंतर तुळजापूर येथे पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी पाऊस जास्त झाल्याने उसाचे क्षेत्र वाढल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न उपस्थित केला होता व तेरणा कारखाना सुरु करणे तितके सहज सोपे नसल्याचे सांगितले होते. पवारांचा सहकार व साखर उद्योगात दांडगा अभ्यास असल्याने तेरणा सुरु करणेबाबत त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
VIDEO | दलित महासंघाचा कोंबडा मोर्चा, पशुपालनासाठी अनुदान वाढवून देण्याची मागणीhttps://t.co/yReu1gRUUO#Dalit | #Dalitfederation | #protest | #Sangli
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 12, 2021
Farmers Labours Demand To Reopen Terna Sugar Factory
संबंधित बातम्या :
धक्कादायक ! मॅनहोलमध्ये लपलंय काय? तब्बल 21 लाखांचं सोनं, पोलीसही हैराण
Corona Positive | बापरे! कोरोना रुग्ण थेट रुग्णालयातून ग्रामपंचायतीत; सरपंचपदाच्या निवडणुकीत भाग