गडचिरोली : भामरागड तालुक्यातील (Bhamragad Taluka) धोंडराज या गावात एक लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या या चार नक्षलवाद्यांची गुप्त माहिती गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल विरोधी पोलीस पथकाला (Anti Naxal Police Squad) लागली. या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पदाचे चार तुकडे धोंडराज परिसरात रवाना करण्यात आले. या चार नक्षलवाद्यांना दोडराज पोलीस (Dodraj Police) स्टेशन परिसरात दोन नक्षलविरोधी पोलीस पथकाने अटक केली. या चार नक्षलवादी एकूण 18 गुन्हे दाखल आहेत. जाळपोळ, हत्या, खून, अपहरण, चकमक असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
अटक झालेल्या चार नक्षलवाद्यांना पैकी दोन ACM सदस्य आहेत. दोन सर्वसाधारण सदस्य आहेत. त्यांना अटक केल्यानंतर जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आरोग्य तपासणी करून जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आले.
ती सर्व कारवाई गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोठी यशस्वी गडचिरोली पोलीस विभागाला व नक्षलविरोधी पोलीस पथकाला यावेळी मिळालेली आहे.
चार जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलंय. साध्या वेशात, विनाशस्त्र हे नक्षलवादी आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांना अटक केली. चारमध्ये एका महिलेचा समावेश आहे. दोन जहाल नक्षल्यांवर 14 लाखांचे तर दोघांवर चार लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. गुरुवारी पहाटे नेलगुंडा येथे साध्या वेशात असताना त्यांना अटक करण्यात आली. पोलीस आल्याची चाहूल लागताच हे पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी जेरबंद केले. बापू वड्डे, मारोती गावंडे, बापूची पत्नी सुमन आणि अजित यांना अटक करण्यात आली.