गडचिरोली : राज्य सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. हा आक्रोश बाहेर काढण्यासाठी जनआक्रोश मोर्चाची सुरुवात भाजपच्या वतीनं गडचिरोली येथून करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. फडणवीस म्हणाले, कोरोनाकाळात आदिवासींना (Adivasi) मदत करा, असा आक्रोश आम्ही करत होतो. पण, राज्य सरकारनं दारु दुकानदारांना मदत केली. त्यांची लायसन्सची फीस पन्नास टक्के केली. गडचिरोली, चंद्रपूर (Chandrapur), नंदुरबारच्या शेतकऱ्यांचं पन्नास टक्के वीज बील माफ केलं नाही. हे राज्य सरकार आपला आवाज दाबू शकतो नाही, या सरकारमध्ये आवाज दाबण्याची हिम्मत नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. आमचा आवाज जनता आहे. जनतेवर अन्याय सहन करणार नाही. अन्याय झाला तर ही जनता तक्त पालटून टाकेल. जनआक्रोश मोर्चाची सुरुवात गडचिरोलीतून केली. या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 मॅच चाललीय. दोन्ही टीम यांच्याचं आहेत. जिथे जाऊ तिथे खाऊ असं हे सरकार आहे. 2024 ला भाजप बहुमताचं सरकार असेल. आम्ही म्हटलं की सरकार आणतो तर यांना वाटत आपलं सरकार पडते की काय. आणि भ्रष्टाचार करायला लागतात, असा आरोप फडणवीस यांनी केला.
मुंबईतून बिल्डरांचा थकलेला कर घ्या आणि वीज द्या शेतकऱ्यांना, अशी मागणी फडणवीस यांनी केली. पण हे सरकार बिल्डरांवर मेहरबानीवर आहे. कारण ते त्यांना मालपानी देतात. कोरोनात यांनी बारमालकांचं भलं केलं. या सरकारने 50 टक्के दारु लायसन्सची फी रद्द केली. विदेशी दारुवरचा कर अर्धा करण्याचं काम या सरकारनं केलं. या महाराष्ट्रात बेवड्यांचं सरकार आलं. त्यांना बेवड्यांचं हित जास्त आहे, असाही घणाघात त्यांनी केला.
कोरोनात वेशांना द्यायचे पैसे यांनी ते आपल्या नातेवाईकांना दिले. वेशांना द्यायच्या पैशावर डल्ला वापरणाऱ्यांना काय म्हणतात. संजय राऊत तो शब्द नेहमी वापरतात. असे काही लोक या सरकारमध्ये आहेत. सत्तापक्षाचे नेते धान खरेदी केंद्रांचे मालक होत आहेत. आमच्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस हे सरकार देत नाही. कोरोनाच्या 24 महिन्यात शिवसेनेच्या यशवंत जाधव यांनी 400 कोटी रुपयांचे संपत्ती घेतली. यशवंत जाधव म्हणतात, मला 10 टक्केच मिळाले 90 टक्के कुठे गेले हे सर्वांना माहीत आहे. धानाचं बोनस द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही म्हाला निवडून दिलं. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसून हे सरकार आलं. धोक्यातून आलेलं हे सरकार सामान्य माणसांच्या पाठीत खंजीर खुपसत आहे, असंही फडणवीस म्हणाले.
Nitesh Rane: राऊतांसारख्या राष्ट्रवादीच्या भोंग्याला किती महत्त्व द्यायचं?; नितेश राणेंचा सवाल
Maharashtra News Live Update : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा आवडता छंद, पर्यायी इंधन परिषदेत मुख्यमंत्री ठाकरेंचा संवाद