बुलेट ट्रेनला ६ हजार कोटी, तर शेतकऱ्यांना किती?, अंबादास दानवे यांचा सवाल

| Updated on: Jan 12, 2023 | 9:20 PM

मुंबई ते अहमदाबादला जाणाऱ्या ट्रेनसाठी सहा हजार कोटी रुपये दिले गेलेत. विदर्भ, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी ३७ शे कोटी रुपये मागितले आहेत. पण, हे सरकार हे पैसेसुद्धा देत नाही.

बुलेट ट्रेनला ६ हजार कोटी, तर शेतकऱ्यांना किती?, अंबादास दानवे यांचा सवाल
अंबादास दानवे
Follow us on

बुलढाणा : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मस्थळी भेट दिली. 425 जन्मोत्सव निमित्त दानवे यांनी मा जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) – भाजप सरकारवर टीका केली. अंबादास दानवे म्हणाले, महापुरुषांच्या बद्दलचे वक्तव्य केले गेले. एक नवीन इतिहास काही लोक निर्माण करू पाहत आहे. जे ऊर्जा देणारे महापुरुष आहे त्यांना नाहक डिस्टर्ब केलं जातंय. मात्र महाराष्ट्र लेचा पेचा नाहीये.

 

बच्चू कडूं यांचा घातपात कोण करेल?

 

बच्चू कडू यांचा झालेला अपघात हा अपघात म्हणूनच पहावं. घात-पात कोण करेन. बच्चू कडूंचा, घात-पात कोणी करेल असे मला वाटत नाही, असंही अंबादास दानवे म्हणाले.

 

शिंदे सरकार हे असंवैधानिक सरकार आहे. हे संपूर्ण जगाला माहीत आहे. हे सरकार फार लांब काळ चालणार नाही. न्याय देवता आंधळी नसून या हिंदुस्तानी जिवंत आहे, असंही  दानवे यांनी सांगितलं.

 

महाविकास आघाडीचे सरपंच भूलणार नाहीत

 

महाविकास आघाडीचे सर्वाधिक सरपंच आले आहेत. मात्र भाजपवाले त्यांना आमिष दाखवत आहेत. वीस लाख पंचवीस लाख निधी देऊ असे म्हणताय. मात्र या अमिषाला महाविकास आघाडीचे सरपंच भुलणार नाही, असा टोला अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.

 

मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचं आहे. रयतेचं आहे, शेतकऱ्यांचं हे राज्य आहे. परंतु, शेतकऱ्याला अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही.

 

सरकार जनतेचं की उद्योगपतींचं

 

मुंबई ते अहमदाबादला जाणाऱ्या ट्रेनसाठी सहा हजार कोटी रुपये दिले गेलेत. विदर्भ, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी ३७ शे कोटी रुपये मागितले आहेत. पण, हे सरकार हे पैसेसुद्धा देत नाही. त्यामुळं हे सरकार जनतेचं आहे की उद्योगपतींचं आहे, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.

 

महाराष्ट्रात एल्गार पुकारावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानीनं तलवार दिली आहे. जिजाऊ या राजमाता, राष्ट्रमाता आहेत. या राष्ट्रमातेनं स्वराज्याची प्रेरणा दिली आहे.

 

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झाली. यामुळं बऱ्याच लोकांचे डोळे विस्फटले गेले. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र कशी, असं बऱ्याच जणांना वाटलं. भगवा शिवसेना अटकेपार नेल्याशिवाय राहणार नाही, असंही अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितलं.