Gadchiroli | आदिवासी विकास महामंडळाकडून धान्य खरेदीत मोठा गैरव्यवहार, दोघांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

| Updated on: Jul 27, 2022 | 8:53 AM

गडचिरोली आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान्य खरेदीत मोठा गैरव्यवहार आढळून आलायं. आता हा गैरव्यवहार करणाऱ्या दोघांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीयं. या गैरव्यवहारामध्ये पैशात मोठी अफरातफर करण्यात आली होती.

Gadchiroli | आदिवासी विकास महामंडळाकडून धान्य खरेदीत मोठा गैरव्यवहार, दोघांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल
Follow us on

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान्य खरेदीत गैरव्यवहार आढळून आल्याने मोठी खळबळ उडालीयं. आता याप्रकरणी गुन्हे दाखल (Crimes filed) करण्यात आलेयं. धान्य खरेदीवर आदिवासी विकास महामंडळाकडून आलेल्या पैशात मोठी अफरातफर आढळून आली होती. एटापल्ली व उडेरा दोन सोसायटी मार्फत संतोष पुल्लुवार व देवानंद हिचामी हे दोन सचिव असून या सचिवांनी खरेदी प्रकरणात मोठा गैरव्यवहार केला आहे. धान्य खरेदीतील या गैरव्यवहारानंतर संपूर्ण जिल्हात (District) मोठा हादरा बसलायं.

आदिवासी विकास महामंडळाकडून करण्यात आलेल्या धान्य खरेदीत गैरव्यवहार

गडचिरोली आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान्य खरेदीत मोठा गैरव्यवहार आढळून आलायं. आता हा गैरव्यवहार करणाऱ्या दोघांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीयं. या गैरव्यवहारामध्ये पैशात मोठी अफरातफर करण्यात आली होती. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर जिल्हाधिकारी संजय मीना लक्ष ठेवून आहेत.

हे सुद्धा वाचा

जिल्हाधिकारी संजय मीना करणार प्रकरणाची संपूर्ण चाैकशी

धान्य खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी अहेरी शुभम गुप्ता यांनी थेट पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. यामुळेच आता गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार हे स्पष्टच आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटकही केली असून एक आरोपी मात्र फरार असल्याचे कळते आहे. या प्रकरणावर जिल्हाधिकारी संजय मीना स्वत: करणार चौकशी करणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.