राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील मोरगाव येथील पूजा देवजी चिरकुटलेवाड ही कॉलेजच्या पहिल्या दिवशी जात होती. भोकर हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गाववरील मोरगाव (पोटा) पोहचली. तेवढ्यात भोकरकडून हिमायतनगरकडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने पूजाला उडवले. ही घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. हे वृत्त पसरताच शेकडो नागरिक घटनास्थळी आले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला होता. युवकांनी पोटा बुद्रूक बसस्थानकावर ट्रकला जप्त केले. चालक ट्रक सोडून पसार झाला. हिमायतनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.
भोकर हिमायतनगर महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले. ट्रकचालकाचा वेग जास्त असल्याने कॉलेज युवतीला आपले प्राण गमवावे लागले. मोरगाव येथील पूजा चीरकुचिटलेवाड (वय १७ वर्षे) असे मृतक युवतीचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. पण, युवकांनी वडगाव येथील मित्रांना फोन करून ट्रक अडवला. तिथून ट्रकचालक पसार झाला. पोटातील शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी घटनेची माहिती हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर आणि नंदलाल चौधरी यांना दिली. पोलिसांनी हिमायतनगर येथे आरोपीला अटक केली.
तामसा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी, बीट जमादार जोगदंड, सूर्यवंशी यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह भोकर येथे शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोटा बुद्रुक येथील बस स्टॉपवर अपघात करणाऱ्या ट्रकला हिमायतनगर पोलिसांनी जप्त केले.
पूजा ही मोरगाव येथील महाकाली देवीचे पुजारी देवजी महाराज यांची एकुलती एक कन्या. अपघाताची वार्ता परिसरात पसरल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले. राष्ट्रीय महामार्गावर वाहनाचा वाढलेला वेग आणि बेसुमार पळवणाऱ्या गाड्या बेशिस्त चालकामुळे अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गाव तिथे गतिरोधक दिल्यास अपघाताच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.