चंद्रपूर : चंद्रपुरातल्या गोसेखुर्द कालव्यात वाघांचं बस्तान मांडलं. गर्मीपासून बचावासाठी ही युक्ती केली असावी, असं तज्ज्ञांना वाटतं. ब्रम्हपुरी तालुक्यातील (in Bramhapuri taluka) लाखापूर-मगरमेंढा दरम्यान असलेल्या गोसेखुर्द च्या कालव्यातील ही घटना आहे. या भागात घनदाट जंगल आहे. अनेक तृणभक्षी प्राणी (herbivores) या कालव्यात पाणी प्यायला येतात. त्यामुळे मुबलक प्रमाणात असलेली शिकार आणि उन्हाळ्यात गर्मीपासून बचाव व्हावा म्हणून या वाघांनी गोसेखुर्द कालव्यात (Gosekhurd canal) बस्तान मांडलं असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
कालव्याच्या बाजूला वाळू आहे. या वाळूवरून येरझऱ्या घालताना हा वाघ दिसत आहे. बाजूला पाणी आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूला गवत आहे. गवत खाण्यासाठी प्राणी येतात. शिवाय पाणी पिण्यासाठीही प्राणी येतात. अशावेळी या ठिकाणी आयती शिकार वाघाला मिळू शकते. यासाठी हा वाघ वाळूवर रपेट मारताना दिसत आहे.
हा वाघ कालव्याच्या पाण्यात आस्तेकदम करताना दिसत आहे. हळूहळू पावले समोर टाकत आहे. पाण्याचा अंदाज घेत आहे. जास्त खोल पाणी नाही, याची खात्री झाल्यानंतर तो पुढं जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द येथील कालव्यात फिरताना वाघ. pic.twitter.com/nCcrmCpfPT
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 10, 2022
व्हिडीओ काढत असताना आवाज येतो. तो वाघ आपल्याकडं तर येणार नाही, अशी भीती व्हिडीओ काढणारे घेत आहेत. तो आपल्याकडं आला तर आपण सुरक्षित कसे राहू याची काळजी घेताना ते दिसत आहेत.