अबुझमाड जंगलात पोलिसांची मोठी कारवाई; पोलीस-नक्षल चकमकीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 01, 2023 | 4:14 PM

जंगलात नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देत पोलीस विभागाने गोळीबार केला. पोलिसांच्या वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात प्रसार झाले.

अबुझमाड जंगलात पोलिसांची मोठी कारवाई; पोलीस-नक्षल चकमकीत नेमकं काय घडलं?
Follow us on

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात अनेक नक्षल विरोधी पोलीस पथक कार्यरत आहेत. आज सकाळपासून ऑपरेशनवर निघालेले नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या तुकड्या भामरागड तालुक्यातील अबुझमाड जंगल परिसरात दाखल झाल्या. त्यानंतर जंगलात नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देत पोलीस विभागाने गोळीबार केला. पोलिसांच्या वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात प्रसार झाले. या ठिकाणावर नक्षलवाद्यांचा दलम असल्यामुळे काही नक्षल सशस्त्र साठा आणि साहित्य पोलीस विभागाने जप्त केला.

नक्षलवाद्यांच्या केंद्रबिंदू अबूझमाड जंगल परिसर

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागात भामरागड हे एटापल्ली तालुक्यातील अबुजमाड जंगल परिसर आहे. ही पहाडी खूप मोठी असून नक्षलवाघांना लपण्यासाठी किंवा अनेक नक्षलवाद्यांचे दलम याच पहाडीवर वास्तवास असतात.

हे सुद्धा वाचा

मागील काही वर्षांपूर्वी याच अबुझमाड पहाडीवर नक्षलवादी यांनी शस्त्र साठा तयार करणारा कारखाना तयार केला होता. याला नक्षलविरोधी पोलीस पथक सी सिक्सटीने उद्ध्वस्त केला होता. अशा मोठ्या हल्ल्यांची कारवाई करण्यासाठी सुरक्षित असलेला अबुझमाड पहाड नक्षलवाद्यांच्या नेहमीच केंद्रबिंदू बनलेला आहे.

एक नक्षलवादी ठार

या भागात छत्तीसगड पोलीस, सीआरपीएफ किंवा नक्षलविरोधी पोलीस पथक सी सिक्सटी गडचिरोलीतर्फे ऑपरेशन राबविण्यात येतात. मोठ्या प्रमाणात नक्षल शस्त्रसाठा पोलीस हस्तगत करतात. अशातच आज सकाळी 10 वाजेपासून सुरू असलेल्या चकमकीत एक नक्षलवादाला कंटस्थान घालण्यात पोलिसांना यश आले.

सायंकाळी पथक मुख्यालयात परत येणार

हा भाग अतिसवेदशील अति दुर्गम असल्यामुळे नक्षलविरोधी पोलीस पथकांना सेटलाईट फोनच्या माध्यमाने संपर्क करण्यात आला. ऑपरेशन पूर्ण करून नक्षलविरोधी पोलीस पथक हे जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आज सायंकाळपर्यंत दाखल होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद या संदर्भात आयोजित करण्यात आली आहे.

नेहमी नक्षल विरोधी पोलीस पथकाचे कारवाई झाल्यानंतर त्या भागात पोलीस तुकड्या वाढविण्यात येतात. भामरागड तालुक्यातील अनेक पोलीस स्टेशन मार्फत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तुकड्या ऑपरेशन राबवण्यासाठी अनेक जंगल परिसरात दाखल झाल्याची पोलीस सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली.