तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने महापालिका आयुक्तांना बूट फेकून मारला, कारण काय?

| Updated on: Apr 03, 2023 | 2:37 PM

लोकशाही दिनानिमित्त सांगली महापालिकेत नागरिकांच्या तक्रार ऐकून घेण्याचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी एक व्यक्ती आपली तक्रार घेऊन आला होता. मात्र त्याची तक्रार आपल्या अखत्यारित येत नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. यामुळे चिडलेल्या व्यक्तीने भयंकर कृत्य केले.

तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने महापालिका आयुक्तांना बूट फेकून मारला, कारण काय?
महापालिका आयुक्तांवर बूट फेकला
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली / शंकर देवकुळे : सांगली महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्यावर एका व्यक्तीने बूट फेकून शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या कैलास काळे नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. लोकशाही दिनानिमित्ताने तक्रार देण्यासाठी हा व्यक्ती आला होता. आयुक्तांवर झालेल्या या हल्ल्याच्या घटनेनंतर महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत सांगली महापालिकेसमोर निदर्शने केली आहेत. संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई, करावी अन्यथा काम बंद सुरूच राहिल असा इशारा दिला आहे.

लोकशाही दिनानिमित्त तक्रार देण्यासाठी गेला होता

लोकशाही दिनानिमित्त सांगली महापालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये विविध तक्रारी ऐकून घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. आयुक्त, उपायुक्त यांच्या उपस्थितीत ही सुनावणी सुरु होती. यावेळी कैलास काळे याने गुंठेवारी प्रमाणपत्र बाबतीत असणाऱ्या त्याची तक्रार आयुक्त पवार यांच्यासमोर सादर केली. पण कायदेशीरदृष्ट्या आयुक्तांनी सदरची तक्रार मान्य करण्यात येत नसल्याचे सांगितले. याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करण्यास सांगितले.

आरोपी सांगली पोलिसांच्या ताब्यात

यानंतर कैलास काळे याने रागाच्या भरात आयुक्त सुनील पवार यांना शिवीगाळ करत, त्यांच्या अंगावर आपल्या पायातला बूट फेकून मारला. या घटनेनंतर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कैलास काळे याला ताब्यात घेत, सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. काळे याची तक्रार आणि मागणी आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे स्पष्ट केले होते, असे आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

या सर्व प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोयी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन बंद करावे. तसेच नागरिकांची गैरसोयी टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.