नांदेड : लग्नाचं वय नियमानुसार मुलासाठी २१ वर्षे असलं तरी योग्य वयात लग्न व्हावं, असं प्रत्येकाला वाटते. २५ ते ३० वर्षे वयात बहुतेक तरुणांची लग्न होतात. काही अपवाद वगळ्यास त्यानंतरही लग्न होतं. पण, एका मुलाचे लग्नाचे वय निघून गेले तरी अद्याप त्याला मुलगी मिळाली नाही. त्यामुळे तो परेशान आहे. आता त्याने सोशल मीडियावर मला लग्नासाठी मुलगी हवी म्हणून आवाहन केलंय. त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कर्नाटक राज्यातील महाराष्ट्र सीमेवरच्या तब्बल आठ फूट उंची असणाऱ्या एका तरुणांचे व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. औराद तालुक्यातील चिंताकी गावातील मारुती कोळी या तरुणांची उंची जवळपास आठ फूट आहे. मात्र त्याच्या या अधिकच्या उंचीमुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागतंय.
घरची गरीब परिस्थिती असणाऱ्या या मारुतीला मदत करण्याचे आवाहन सोशल मीडियावर करत त्याचे व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. कर्नाटक सरकारने आपल्याला कोणतीच मदत केली नसल्याचा दावा हा युवक या व्हीडिओमधून करतोय. विशेष म्हणजे 37 वर्ष वय होऊनही त्याला लग्नासाठी मुलगी ही मिळेनासी झालीय.
मारुतीने वयाची ३५ ओलांडली. त्याच्या मित्रांची लग्न झाली आहेत. त्यांना मुलबाळही आहेत. ते मुलांना खेळवतात. आणि मारुती अद्याप लग्नासाठी मुलीच्या शोधात आहे. त्याची उंची या लग्नासाठी आड येत आहे. आठ फूट उंच असल्यामुळे सहसा त्याला कोणी मुलगी देईना.
एवढ्या उंच मुलाशी कोण लग्न करणार, असं मुली म्हणतात. त्यामुळे मारुतीचे लग्न होत नाही. माझ लग्न जुळण्यासाठी सरकारनं कोणतीही मदत केली नाही. असा आरोपही हा मुलगा करत आहे. आतातरी त्याच्या उंचीशी साजेसी मुलगी त्याला मिळते का ते पाहावं लागेल.
मारुती लग्नासाठी आतूर झाला आहे. गुडघ्याला बाशिंदही त्याने बांधले आहे. पण, लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने तो प्रचंड निराश आहे.