अवैध धंद्याची तक्रार केली म्हणून असा घेतला बदला, थरारक घटनेने नगर हादरले

| Updated on: Jun 20, 2023 | 6:00 PM

पोलिसांना माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाते. त्यानंतर अवैध धंद्यांवर रेड केली जाते. त्यामुळे तक्रार करणाऱ्याचे नाव समोर येत नाही.

अवैध धंद्याची तक्रार केली म्हणून असा घेतला बदला, थरारक घटनेने नगर हादरले
Follow us on

कुणाल जायकर, प्रतिनिधी, अहमदनगर : अवैध धंदे काही ठिकाणी सुरू आहेत. याची तक्रार केल्यामुळे पोलिसांनी आमच्यावर रेड टाकली असा आरोपींना संशय आला. यातून त्यांनी दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका जणाचा जीव गेला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यांत या लोकांनी तक्रार दिली असल्याच्या संशयातून हा हल्ला झाला. पोलिसांना माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाते. त्यानंतर अवैध धंद्यांवर रेड केली जाते. त्यामुळे तक्रार करणाऱ्याचे नाव समोर येत नाही. पण, संशयातून हा हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दोन युवकांवर तलवारीने वार

अहमदनगरला शहरातील रोड येथे अवैध धंद्याची तक्रार केल्याची घटना घडली. या रागातून दोन युवकांवर तलवारीने वार करण्यात आलेत. यात एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ओंकार ऊर्फ गामा पांडुरंग भागानगरे असे मृतक युवकाचे नाव आहे. तर शुभम पडोळे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अहमदनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलय.

 

हे सुद्धा वाचा

तीन जणांविरोधात गुन्हे

मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रोडवरील रूबाब कलेक्शन समोर ही घटना घडली. या प्रकरणी तिघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश केरुप्पा हुच्चे, नंदु बोराटे आणि संदीप गुडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. मध्यरात्री सिनेस्टाईलने घडलेल्या या घटनेमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांची पथकं रवाना

याप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. तीन जणांना एकावर तलवारीने वार केला. एकाचा मृत्यू झाला. तोफखाना पोलीस स्थानकात ३०२ आणि ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी शांत राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.