भरधाव कार रसवंतीगृहात घुसली, पुढे जे घडलं ते दुर्दैवी !

| Updated on: Mar 27, 2023 | 11:00 AM

दहा वर्षाचा चिमुकला आपल्या वडिसांसोबत दुकानात बसला होता. अचानक जे घडले त्यानंतर आता चिमुकला पुन्हा कधीच वडिलांसोबत आपल्या दुकानात बसू शकणार नाही.

भरधाव कार रसवंतीगृहात घुसली, पुढे जे घडलं ते दुर्दैवी !
सांगलीत अनियंत्रित कार दुकानात घुसली
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली / शंकर देवकुळे : सांगलीतील पलूस तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव कार अनियंत्रित झाल्याने रसवंतीगृहात घुसली. यात रसवंतीगृहात बसलेला 10 वर्षाचा मुलगा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तसेच रसवंतीगृहाचेही मोठे नुकसान झाले आहे. पलूस तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे रविवारी दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे खंडोबाची वाडी गावावर शोककळा पसरली आहे. तर मुलाच्या मृत्यूमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले

तासगाव भिलवडी रस्त्यालगत खंडोबाचीवाडी येथे एका पेट्रोल पंपाच्या जवळ शेताकडेला संतोष गोपाळ शिंदे यांचे रसवंतीगृह आहे. रविवारी दुपारी भिलवडी स्टेशनकडून भरधाव वेगाने एक कार खंडोबाचीवाडी येथून चालली होती. कारचा वेग इतका होता की चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले अन् रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेली कार उजव्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या रसवंतीगृहात घुसली.

अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

यावेळी रसवंतीगृहात शिंदे यांचा 10 वर्षाचा मुलगा बसला होता. कार रसवंतीगृहात घुसताच कारच्या पुढील चाकाखाली येऊन शिंदे यांच्या 10 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रककरणी भिलवडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अपघातात रसवंतीगृहाचेही मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुणचा अपघाती मृत्यू

ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईक पडून ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. ट्रकला ओव्हरटेक करत पुढे जाण्याच प्रयत्न बाईकस्वार करत होता. मात्र या प्रयत्नात जीवच गमावून बसला. पोलीस मयत तरुणाची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.