सातारा : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी शासन-प्रशासन शर्थीचे प्रयत्न करतंय. याच अनुषंगाने शासनाने कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी काही नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. त्यानुसार पर्यटन स्थळी जाण्यास बंदीच घालण्यात आली आहे. मात्र तरीही काही पर्यटक शासनाचा आदेश पायदळी तुडवून पर्यटन स्थळांवर गर्दी करताना दिसून येतात. साताऱ्याच्या सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी केलीय. गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
साताऱ्याच्या सडावाघापुर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी अद्दल घडवली. पर्यटकांकडून आर्थिक स्वरुपाचा दंड वसूल केला गेला. आतापर्यंत 1 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय.
प्रसिद्ध असलेला सडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सडा वाघापूर येथे येत आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली असताना देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनस्थळावर येत असल्याने पाटण पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पावसाळ्याच्या हंगामात 500 पर्यटकांवर कारवाई केली असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे.
दुसरीकडे वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे साताऱ्याच्या महाबळेश्वर आणि पाचगणीमधील दुकानदारांनी-व्यापाऱ्यांनी मात्र संताप व्यक्त केलाय. ‘महाबळेश्वर, पाचगणीमधले निर्बंध ह़टवा, आम्हाला जगू द्या. कोरोना आणि लॉकडाऊनने आम्ही उध्वस्त झालोय. पण आता परिस्थिती पूर्ववत होत असताना आमचाही विचार करा. आमचे व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी द्या’, असं साकडं महाबळेश्वर, पाचगणीमधल्या व्यापाऱ्यांनी साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घातलं.
(Action against Sada Waghapur Waterfall Tourists by Satara Patan Police)
हे ही वाचा :
ईडीची नोटीस का आली? जरंडेश्वरला किती कर्ज दिलं? सातारा जिल्हा बँकेचा महत्वाचा खुलासा