रायगड : सोसाट्याचा पाऊस आणि पुरामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. पूरग्रस्तांना पुन्हा उभं राहण्यासाठी अनेकांनी सढळ हाताने मदत केली. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांना यापूर्वी तब्बल 10 कोटींची मदत जाहीर केली होती. या मदतीनंतर दीपाली सय्यद यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथील पूरग्रस्त पूजा चव्हाणच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे. दीपाली सय्यद त्यांच्या चँरिटेबल ट्रस्टतर्फे पूजाच्या लग्नाचा खर्च उचलणार आहेत. (Actress Deepali Syed has taken responsibility of marriage of flood affected girl Pooja Chavan)
मागील काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने हाहा:कार माजवला. यामध्ये कोट्यवधीचे नुकसान तर झालेच पण प्रचंड जीवितहानी झाली. या पुरामुळे अनेकांची घरं उद्धवस्त झाली. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथील पूजा चव्हाण या मुलीचे लग्न होते. पूजाच्या लग्नासाठी तिच्या घरच्यांनी काही दागिने जमवले होते. हे सर्व दागिने पूजाच्या आई-वडिलांनी शेजारी राहणाऱ्या भरत सुतार यांच्या घरात ठेवले होते. मात्र, पावसामुळे सुतार यांच्या घरावर दरड कोसळली आणि यातच पूजाच्या लग्नासाठी ठेवलेले सर्व दागिने दबून गेले.
दीपाली सय्यद मागील काही दिवसांपासून पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी आज त्यांनी साखर सुतारवाडी येथे भेट दिली. तसेच येथे सय्यद यांनी दरडग्रस्त घरांची पहाणी केली. ही पाहणी करत असताना सय्यद यांना पूजा चव्हाणसोबत घडलेला प्रकार समजला. त्यानंतर सय्यद यांनी पुजा चव्हाण तसेच आईची भेट घेतली. या भेटीनंतर पूजाच्या लग्नाचा सर्व खर्च उचल्याची घोषणा केली. अभिनेत्री दीपाली सय्यद चँरिटेबल ट्रस्टतर्फे पुजा चव्हाणच्या लग्नाचा सर्व खर्च उचलला जाणार आहे.
इतर बातम्या :
Tokyo Olympics 2021 : टोक्यो ऑलिम्पिकची सांगता, भारताकडून बजरंग पुनियाने फडकावला तिरंगा!
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल; दिल्ली दरबारी भाजपची काय खलबतं होणार?
Pune Unlock : व्यापाऱ्यांच्या आक्रमकतेनंतर अखेर पुण्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलता! काय सुरु, काय बंद? https://t.co/67Pzq4nCaX @AjitPawarSpeaks @OfficeofUT @neelamgorhe @mohol_murlidhar @BJP4Maharashtra #PuneFightsCorona #PUNE #AjitPawar #PuneCoronaUpdate #coronaguidelines
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2021
(Actress Deepali Syed has taken responsibility of marriage of flood affected girl Pooja Chavan)