शासकीय कार्यालयांची टाळे उघडताच ACB अ‍ॅक्टिव्ह, 6 महिन्यात 36 ट्रॅप, अनेक अधिकारी जाळ्यात!

| Updated on: Jul 30, 2021 | 10:03 AM

जग एकीकडे कोरोनाशी लढत असताना लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र नांदेडमध्ये उघडकीस आलंय. लाचलूचपत प्रतिबंधात्मक विभागाने दिलेल्या माहितीतून ही धक्कादायक आकडेवारी उघड झालीय.

शासकीय कार्यालयांची टाळे उघडताच ACB अ‍ॅक्टिव्ह, 6 महिन्यात 36 ट्रॅप, अनेक अधिकारी जाळ्यात!
फाईल फोटो
Follow us on

नांदेड :  जग एकीकडे कोरोनाशी लढत असताना लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र नांदेडमध्ये उघडकीस आलंय. लाचलूचपत प्रतिबंधात्मक विभागाने दिलेल्या माहितीतून ही धक्कादायक आकडेवारी उघड झालीय. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना साथीच्या काळात लाचखोरीच्या तक्रारीत कुठेही घट झालेली नाहीये उलट गेल्या सहा महिन्यात लाचेच्या मागणीत वाढच झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने सांगितलंय.

बड्या अधिकाऱ्यांना सापळे रचून अटक

विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात बड्या अधिकाऱ्यांना सापळे रचत लाच घेताना अटक झालीय. त्यामुळे क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही असा समज नागरिकांनी डोक्यातून काढून टाकावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या  विभागीय अधिकारी कल्पना भारवकर यांनी केलंय.

6 महिन्यात 36 ट्रॅप

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आता हळूहळू शासकीय कार्यालयं उघडत आहेत. दुसरीकडे शासकीय कार्यालयात एसीबीचे ट्रॅपही वाढू लागलेले आहेत. नांदेड परिक्षेत्रात मागील सहा महिन्यात 36 ट्रॅप एसीबीने लावले.

सर्वाधिक ट्रॅफ नांदेडमध्ये

परीक्षेत्रामध्ये सर्वाधिक ट्रॅप हे नांदेड युनिटमध्ये केले गेले. त्या खालोखाल लातूर परभणी आणि हिंगोली यांचा समावेश आहे. मात्र 2020 2021 मध्ये या चारही युनिटमधील एसीबी ट्रॅपची संख्या कमालीची घटली आहे.

आरटीओविरोधात तक्रारी असतील तर द्या, नक्की ट्रॅप लावू!

पाठीमागच्या दीड वर्षात 18 अधिकाऱ्यांवर ट्रॅफ यशस्वी झाले आहेत. आरटीओ विरोधात कारवाई होत नाही असा सूर आहे, प्रत्यक्षात आरटीओ विरोधात तक्रारी येतच नाहीत… या तक्रारी आल्या तर 100% ट्रॅफ केले जातील, अशी ग्वाही नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिली.

(After opening government offices, ACB is also active In nanded)

हे ही वाचा :

प्रवाशांच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकत कारवर सिनेस्टाईल दरोडा, 22 लाख लुटणारे आठ आरोपी गजाआड