उस्मानाबाद : परीक्षेत कॉपी (Copy) करताना पकडल्याने एका कृषी पदविका (Diploma in Agriculture) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. स्वप्नील फुलचंद ढोबळे (21) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो समुद्रवाणी येथील रहिवासी आहे. स्वप्नीलने स्वतःच्या शेतात कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्नील कृषी पदविका अभ्यासक्रमाचा विषयचा पेपर देण्यास गेला होता. यावेळी परिक्षा केंद्रात त्याला कॉपी करताना परीक्षा विभागाच्या पथकाने पकडले. कॉपी करताना पकडल्याने त्याला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. यामुळेच तणावातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली.
मयत स्वप्नील ढोबळे हा कृषी पदविका अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. येडशी येथील ऍग्री कल्चर महाविद्यालयात डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. सध्या स्वप्नीलची परीक्षा सुरु आहे. स्वप्नील नेहमीप्रमाणे 26 मे रोजी येडशी येथील आपल्या महाविद्यालयात पेपर देण्यास गेला होता. स्वप्नीलचा परीक्षेचा नीट न झाल्याने त्याने पेपरमध्ये कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कॉपी करत असतानाच परीक्षा विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. यानंतर परीक्षा विभागाकडून स्वप्नीलला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. या सर्व प्रकारामुळे स्वप्नील तणावात होता. याच नैराश्येतून त्याने आपल्या शेतातील कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. स्वप्नीलच्या या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबावर आणि गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वप्नीलच्या पश्चात आई आणि एक भाऊ आहे. कमी वयात स्वप्नीलने आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. (Agriculture diploma student commits suicide after being caught copying in Osmanabad)