अहमदनगर : नुकताच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे, त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे आता खळबळ माजली आहे. एकीकडे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत हिंदू-मुस्लिम या मुद्यावरून निवडणूक लढविण्यात आली तर आता दुसरीकडे एमआयएमने कालीचरण महाराज यांच्यावर वक्तव्य करुन नवा वाद उखरुन काढला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील राजकारणापासून ते महाविकास आघाडीसोबत आघाडी करायची की नाही यावरही त्यांनी चर्चा केली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी कालीचरण महाराजावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे भगवे कपडे घालून कुणी स्वामी आणि गुरु होत नाही, आणि भगवे कपडे घातले म्हणजे त्यांना आता गुरु म्हणायला सुरुवात केली जाते असा टोलाही त्यांनी महाराज लोकांना लगावला आहे.
इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर टीका करताना सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, भगवा कपडा घालून कोणीही महाराज होत नाही. मात्र भगवे कपडे घालून अनेक जण आता महाराज आणि स्वामी होण्याच्या मार्गावर आहेत.
अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी भगवे कपडे घालून स्वामी गुरु म्हणायला सुरुवात केली असा टोलाही त्यांनी त्यांना लगवला आहे.
हे महाराज लोकं काहीही बोलत असतात. हे तोंड उघडले की विष ओकणार असा टोलाही त्यांनी कालीचरण महाराजांना लगावला आहे.
त्यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की,हे महाराज किती दिवस बाहेर आहेत माहीत नाही मात्र त्यांची जागा जेलमध्ये आहे असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
तर त्यांनी पोलिसांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकीय दबावामुळे पोलीस काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतात, मात्र असे 10 कालीचरण जरी आले तरी आमच्या तोंडाला लागू शकत नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
पोलिसांनी मला परवानगी द्यावी मी कालीचरणपेक्षाही चांगले भाषेत त्यांना समजून सांगू शकतो असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
तर इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीविषयी बोलताना सांगितले की, आम्ही महाविकास आघाडीसोबत यायला तयार आहे. मात्र मविआला वाटलं पाहिजे की, एमआयएममध्ये ताकद आहे तरच आम्हाला सोबत घ्या असंही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देश्यून बोलले आहेत.
मविआसोबत जाताना मात्र दुटप्पी भूमिका असून चालणार नाही. कारण दुटप्पी भूमिका घेणं कुठेतरी थांबवायला पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.