अकोला : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली. सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओने धूम ठोकली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक युवक शेतात बसला आहे. तो शेतात बसून काहीतही क्लासमध्ये टाकत आहे. त्यानंतर तो शांतपणे पितो. पण, काही वेळाने त्याला रुग्णालयात नेण्याची वेळ येते. तिथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत. व्हिडीओ पाहून धक्का बसतो. या युवकाने हे धोकादायक पाऊल का उचललं हे अद्याप कळलं नाही.
अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली. अतिदुर्गम भागातील सावरगाव येथील 28 वर्षीय तरुणाचा विष प्राशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शुभम रामचौरे असे गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालय अकोला येथे उपचार सुरू आहेत.
सावरगाव येथील शुभम रामचौरे यांनी व्हिडिओ काढून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी दि. 25 मार्च रोजीच्या संध्याकाळी घडली आहे. शुभम रामचौरे यांनी शनिवारी संध्याकाळी शेतात एका झाडाखाली जाऊन विष घेण्याआधी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. काही न बोलता विष घेतलं.
याचा व्हिडिओ परिसरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रामचौरे यांच्यावर अकोला येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना पातुरमधील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत येते. चांदणी पोलीस स्टेशन येथे तपास केला. त्यांनी अजूनपर्यंत कोणीही तक्रार दाखल केली नसल्याची माहिती आहे.
युवकाच्या या कृत्याची चर्चा सध्या सोशल मीडियात चांगलीच सुरू आहे. त्याने नेमके हे का केले. त्याच्यावर ही वेळ का आली. विशेष म्हणजे त्यानं असा हा धोकादायक प्रयोग का केला, यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तक्रार झाली नसल्याने पोलीस या प्रकरणाचा तपास कदाचित करणार नाही. पण, युवक चांगलाच चर्चेत आला आहे.