Akola : जिल्हा कृषी अधीक्षकांवरील कारवाई सूडबुद्धीनं, शेतकऱ्यांचा आरोप, कृषी व्यावसायिकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप

| Updated on: Jul 27, 2022 | 10:52 AM

जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्याने त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलीयं. डॉ. इंगळे यांच्याकडे कृषी अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील देण्यात आलायं. अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने डॉ. खोत यांच्या त्रासदायक कार्यशैलीच्या विरोधात आवाज उठवलत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते.

Akola : जिल्हा कृषी अधीक्षकांवरील कारवाई सूडबुद्धीनं, शेतकऱ्यांचा आरोप, कृषी व्यावसायिकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप
Image Credit source: tv9
Follow us on

अकोला : अकोला (Akola) जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांचा पदावरून पायउतार करण्यात आलायं. विशेष म्हणजे त्यांना सर्वच पदांवरून काढण्यात आल्याने खळबळ उडालीयं. कृषी व्यावसायिकांनी डॉ. कांताप्पा खोत यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप (Accusation) केले होते आणि हेच प्रकरण त्यांना भोवले आहे. मात्र, डॉ. खोत यांना पदावरून काढल्यानंतर जिल्हात वेगळेच राजकारण (Politics) रंगले असून शेतकऱ्यांनी डॉ. खोत हे अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत आणि त्यांना फसवण्यात आल्याचा आरोप केलायं. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन खोत यांची पाठराखण करत त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची देखील मागणी केलीयं.

जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्याने त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलीयं. डॉ. इंगळे यांच्याकडे कृषी अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील देण्यात आलायं. अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने डॉ. खोत यांच्या त्रासदायक कार्यशैलीच्या विरोधात आवाज उठवलत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर खोत यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केलीयं.

हे सुद्धा वाचा

डॉ. कांताप्पा खोत यांच्या कारवाईविरोधात जिल्हातील शेतकरी मैदानात

डॉ. कांताप्पा खोत यांच्यावरती कारवाई झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण आले असून आता जिल्हातील शेतकरी खोत यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसते आहे. इतके नाही तर शेतकऱ्यांनी खोत यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. खोत यांच्यावरील कारवाई मागे घेतली नाही तर जिल्हातील संपूर्ण शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिलायं.