Ganpatipule Angaraki Sankashti | एसटी संपाचा फटका, गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली

| Updated on: Nov 23, 2021 | 8:26 AM

आज अंगारकी संकष्टी (Angaraki Sankashti) आहे. या निमित्ताने हजारो भाविक रत्नागिरी जवळच्या गणपतीपुळे (Ganpatipule) मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी या वर्षीच्या शेवटच्या अंगारकी चतुर्थीसाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केलेली पहायला मिळाली.

Ganpatipule Angaraki Sankashti | एसटी संपाचा फटका, गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली
Ganpatipule
Follow us on

रत्नागिरी : आज अंगारकी संकष्टी (Angaraki Sankashti) आहे. या निमित्ताने हजारो भाविक रत्नागिरी जवळच्या गणपतीपुळे (Ganpatipule) मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी या वर्षीच्या शेवटच्या अंगारकी चतुर्थीसाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केलेली पहायला मिळाली.

भाविकांना एसटी संपचा फटका

मात्र या अंगारकी चतुर्थीला भाविकांना एसटी संपचा फटका बसलाय. त्यामुळे गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावलेली पहायला मिळाली. दरवर्षी अंगारकी चतुर्थीसाठी शेकडो एसटीच्या बसेस गणपतीपुळे इथं भाविकांना घेवून येत असतात. मात्र, एसटी संपाचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांच्यावर संख्येवर झालेला पहायला मिळतोय.

भाविकांना घेवून येणाऱ्या एसटी बसेस यावर्षी आल्याच नाहीत. त्यामुळे 25 ते 30 टक्के भाविक एसटी संपामुळे दर्शनाला येवू शकले नाहीत. कोरोनाचे नियम पाळून गणपतीपुळे मंदिरात पहाटे पासून दर्शन रांगा पहायला मिळाल्या, दरवर्षी सव्वा ते दीड लाख भाविक अंगारकी चतुर्थीला गणपतीपुळ्याच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र् यावर्षी एसटी संपामुळे ही संख्या 60 ते 70 हजाराच्या घरातच जाण्याची शक्यता आहे.

गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास पुढील दोन दिवस मज्जाव

कोरोना नियमांमध्ये शिथिलता (Corona Restrictions Relaxed) मिळाल्यानंतर आजची अंगारकी ही पहिलीच अंगारकी संकष्टी आहे. त्यापार्श्वभूमीवर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास पुढील दोन दिवस पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. भाविक अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने गणपतीपुळेला येणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवाय, यावेळी भाविकांना कोरोना नियमांचं पालन करणं देखील बंधनकारक असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी काही भरारी पथकं देखील नेमली जाणार असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला गांभीर्याने घेत नाही, केंद्राने राज्याला निर्देश द्यावेत : नारायण राणे

Solapur: एसटीच्या विलिनीकरणासाठी मोहोळच्या शेतकऱ्याचं तुळजाभवानीला साकडं, 45 किमीपर्यंत लोटांगण घालत आंदोलन