Video – Akola | पालकमंत्री बच्चू कडू बनले नायक चित्रपटातील अनिल कपूर! एकाच दिवशी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न…

| Updated on: Feb 25, 2022 | 2:56 PM

सिंचन प्रकल्पातील लोकांच्या पुनर्वसनाचे प्रश्न होते. यासाठी नागरिक-अधिकाऱ्यांना एकत्र बोलावले. त्यांच्या समस्यांचा निपटारा केला. हजारो लोकांचे प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र आज मूर्तीजापुरात होते.

Video - Akola | पालकमंत्री बच्चू कडू बनले नायक चित्रपटातील अनिल कपूर! एकाच दिवशी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न...
पालकमंत्री बच्चू कडू यांनी आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी नागिरक.
Follow us on

अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर (Murtijapur in Akola District) तालुक्यातील जनसवांद यात्रेला सुरुवात झाली आणि लोकांची गर्दी व्हायला लागली. अकोला जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांमुळे (Irrigation Project) बाधित गावांमधील नागरिकांचे पुनर्वसन व त्यांना नागरी सुविधा पुरविण्याबाबत या जनसंवाद यात्रेत उपाययोजना केल्या गेल्या. या जनसंवाद यात्रेत अनेकांच्या तक्रारी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Guardian Minister Bachchu Kadu ) यांनी केलं. घंटो का काम मिंटोमे करून त्यांनी आज नायक चित्रपटातील अनिल कपूर यांची भूमिका साकारली आहे.

चित्रपट पाहिला नि कल्पना सूचली

भूमिअभिलेख कार्यालयात गेले की, कागदपत्रांची यादी दिली जाते. ही सर्व कागदपत्रे आणा. त्याच कार्यालयात अर्धा कागदपत्र मिळतात. मग, ती तिथंच लावून दिल्यास काही फरक परतो का?, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला. पण, बच्चू कडून यांनी नायक चित्रपट पाहिला. तसंच करू म्हणून त्यांनी हा उपक्रम राबविला. स्टॉल लावल्यानंतर गरजू लोकांनी गर्दी केली. सर्व नागरिकांची कामे झाली. तहसीलदारांनी यासाठी साथ दिली. लोकांनी गोंधळ केल्यास आपण पाहून घेऊ, अशी हिंमत दिली. पहिल्या जनसंवाद यात्रेत पंचेचाळीस हजार तक्रारी निकाली काढल्या. त्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागला, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ

पंचेचाळीस हजार तक्रारींचे निवारण

वीस वर्षांपासून थकीत असलेली कामे करून टाकली, असं बच्चू कडू म्हणाले. एकाच ठिकाणी तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आले. त्यांनी या सर्व तक्रारींचा निपटारा केला. कायदा म्हणतो तीन दिवसांत दाखला द्या. पण, कामाच्या बोज्यामुळं ही कामे होत नाहीत. एक-एक माणूस आल्यास वेळ, पैसा आणि श्रम वाया जातो. त्यातही शेतकऱ्यांना अपमान सहन करावा लागतो. लोकांचा अपमान होऊ नये. त्यासाठी लोकप्रतिनिधी असतात. नागरिकांची कामे योग्य पद्धतीनं झाली पाहिजे. त्यावर देखरेख असली पाहिजे. हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. त्यामुळं अशाप्रकारचा उपक्रम राबविल्याचे कडू यांनी सांगितलं.

Nagpur Court | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थानातील घोटाळ्याचा गुन्हा कायम, काय आहे प्रकरण?

Nagpur RSS | श्रीलंकन उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांची संघ मुख्यालयाला भेट, डॉ. मोहन भागवतांशी काय हितगूज?

नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नोंदविला दुप्पट सहभाग, मनरेगातील कोणत्या योजनेत घेत आहेत पुढाकार?