कोल्हापूर : मुलीने आंतरजातीय विवाह (Inter-caste marriage) केल्याच्या रागातून मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरच्यांवर हल्ला(Attack) केल्याची घटना कोल्हापूरात घडली आहे. या हल्ल्यामध्ये मुलाच्या घरातल प्रापंचिक साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली असून मुलाच्या घरच्यांनाही मारहाण करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून त्यानुसार मुलीचे आई, वडील आणि भाऊ, बहिणीवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगनू केशव भाट, आरती जुगनू भाट, प्रकाश उर्फ शुभम जुगनू भाट आणि मानसी उर्फ दिव्या जुगनू भाट अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. (Attack on boy’s family for inter-caste marriage in Kolhapur)
संगीता मिसाळ यांचे मूळ गाव वडवणे असून त्या गेली 25 वर्षे आपल्या मुलासोबत कंदलगाव येथे आपल्या माहेरी आई व भावासोबत राहतात. मुलीने प्रेमविवाह केला म्हणून तिच्या घरच्यांनी संगीता यांच्या घरात घुसून त्यांच्यासह त्यांच्या आई, बहिण, भाऊ, भावजय यांनाही मारहाण केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रणाली पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास करीत आहेत.
कोल्हापुरात एका मुला-मुलीने काल गंगावेश येथे प्रेमविवाह केला होता. या विवाहाची माहिती मुलीच्या घरच्यांना मिळताच त्यांनी मुलाच्या घरी येऊन मुलाच्या घरच्यांना मारहाण केली. मुलाच्या आईला रॉड आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच मुलाच्या घरातील फ्रीज, टीव्ही, भांडी आदि साहित्याचीही तोडफोड केली. याप्रकरणी मुलाची संगीता राजू मिसाळ यांच्या तक्रारीवरुन मुलीचे वडील जुगनू केशव भाट, आई आरती जुगनू भाट, भाऊ प्रकाश उर्फ शुभम जुगनू भाट आणि बहीण मानसी उर्फ दिव्या जुगनू भाट या चौघांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून भाडेकरुने घरमालकिणीची गळा आवळून हत्या केल्याची घटना येरवडा परिसरातील लोहगाव भागात घडली. हत्येनंतर महिलेचा मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकला. त्यानंतर घराला कुलूप लावून आरोपीने पळ काढला. महिलेचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम मोहम्मद शेख असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Attack on boy’s family for inter-caste marriage in Kolhapur)
इतर बातम्या
कार पार्क करताना तरुणीचा अंदाज चुकला, दुसऱ्या मजल्यावरुन पडून गाडी पलटी, खाली उभी कार तर सपाटच
मुंबई लोकल प्रवासात सतर्क रहा! चाकूच्या धाकाने बहीण-भावाची लूट, गर्दी नसताना चौघांनी लुबाडलं