चंद्रपूर : चंद्रपूरच्या काँग्रेस नगरसेवक (Congress Corporator) हल्ला प्रकरणातील आरोपी अखेर गवसले आहेत. 4 मार्च रोजी सकाळी मॉर्निंग वॉकवरून परतणाऱ्या नगरसेवक नंदू नागरकर (Nandu Nagarkar) यांच्यावर 3 युवकांनी क्रिकेट बॅटने हल्ला (Attack) केला होता. राजकीय नेत्यावरील या हल्ल्यानंतर राजकीय, प्रशासकीय वर्तुळ हादरले होते. पालकमंत्री, खासदार व भाजप नेते मुनगंटीवार यांनी पोलीस महासंचालकांपर्यंत हल्ल्याची तक्रार केली होती. चंद्रपूर पोलिसांनी 4 तपास पथके तयार करून बुरखाधारी 3 युवक आणि दुचाकीचा शोध घेत होते. पोलिसांवर असलेल्या प्रचंड दबावानंतर आता तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. शानु उर्फ आसिफ अली आशिक अली (26), राजेश केवट (20), महाकाली कॉलरी निवासी सुमित बहुरिया (22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे तिघेही रय्यतवारी कॉलरी येथील निवासी आहेत. (Attacker arrested for attacking Congress corporator Nandu Nagarkar in Chandrapur)
प्राथमिक माहितीनुसार शहरातील एका मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा बॉल नागरकर यांना लागल्याने त्यांनी या मुलांना हटकले होते. त्याचा राग मनात ठेवून नगरसेवक नागरकर यांना तिघांनी लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. नागरकर यांच्यावर पाळत ठेवून हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मागितली जाणार आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर 19 फेब्रुवारी रोजी गावातील महिला सरपंचाशी विवाह केल्याने संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडलीचे उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावर रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहित मरसकोल्हे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्राणघातक हल्ल्यात उपसरपंच गंगा धंडारे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र आरोपीने हल्ला का केला याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. (Attacker arrested for attacking Congress corporator Nandu Nagarkar in Chandrapur)
इतर बातम्या
Nagpur Crime : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून कामगाराचे साहित्य चोरले, आरोपी अटक