गणेश सोनोने, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अकोला : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे आज अकोला (Akola) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. थोरात म्हणाले, राज्यातल्या कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनाच जर धमकीचा फोन आला, तर राज्यात सुव्यवस्था व शांततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
आम्हाला आता राज्यात असलेल्या सुव्यवस्थेवर आणि शांततेवर काळजी वाटायला लागली आहे. या सरकारमध्ये शांतता व सुव्यवस्था बिघडली की काय.
बाळासाहेब थोरात आज भारत जोडो अभियानाच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
माजीमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही शिंदे आणि फडणवीस सरकारला टोला लगावला. या सरकारबद्दल वाटण्यासारखं खरं तर काही नाही. मुख्यमंत्र्यांना जर धमकीचा फोन येत असेल तर सर्वसामान्याचं माणूस काय करेल, अशी टीका त्यांनी केली.
या देशाची या राज्याची अवस्था बिघडलेली आहे. एवढेच यावर न दिसते. या सरकारबद्दल वाटण्यासारखं खरं तर काही नाही. असा टोला यशोमती ठाकूर यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारला लगावला आहे.
भारत जोडो अभियानाच्या रस्त्याची रेकी करण्यासाठी यशोमती ठाकूर या अकोला जिल्हा दौरावर आल्या होत्या. यावेळी ठाकूर यांनीही राज्य सरकारवर टीका केली. परंतु, या प्रकरणातील आरोपीला अटक केली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.