कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरा(Ambabai Temple)तील नव्या वर्षातील पहिला उत्तरायणातील किरणोत्सव(Kiranotsav) सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी मावळतीची किरणे पूर्णक्षमतेने देवीच्या किरीटापर्यंत पोहोचली. त्यामुळे हा किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेने पार पडला. सुरुवातीला 05:18 मिनिटांनी सूर्याची किरण महाद्वार कमानीतून आत आली. त्यानंतर गरुड मंडप, कासव चौक असा प्रवास करत सूर्यकिरणांनी सहा वाजून 15 मिनिटांनी देवीचा चरणस्पर्श केला. त्यानंतर 06:18 मिनिटांनी किरणे देवीच्या किरीटावर स्थिरावून लुप्त झाली. आज पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्यानं भाविकांतूनही समाधान व्यक्त होत आहे. पुढचे दोन दिवस भाविकांना हा किरणोत्सव सोहळा अनुभवता येणार आहे. (Beginning of Ambabai Kirnotsava of Kolhapur, devotees will be able to experience the festival for the next two days)
साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ असलेल्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा दरवर्षी सुर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन काळामध्ये होत असतो. नोव्हेंबर महिन्यातील सूर्याच्या दक्षिणायनात 9, 10, 11 तर उत्तरायणात 31 जानेवारी 1 व 2 फेब्रुवारीला किरणोत्सव होत असतो. स्थापत्य शास्त्राचा नमुना असलेल्या मंदिरातील किरणोत्सव सोहळा खगोल अभ्यासकांसाठी पर्वणी असते. मात्र गेल्या काही वर्षापासून किरणोत्सव मार्गात आलेल्या अडथळ्या मूळ किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नव्हता.
महाद्वार कमान 5 वाजून 32 मिनिटे
गरुडमंडप पाठीमागे 5 वाजून 36 मिनिटे
गरुद्मंडप मध्यभागी 5 वाजून 42 मिनिटे
गणपती पाठीमागे 5 वाजून 53 मिनिटे
कासव चौक 6 वाजून 1 मिनिटे
पितळी उंबरा 6 वाजून 4 मिनिटे
चांदीचा उंबरा 6 वाजून 8 मिनिटे
गर्भ कोटी 6 वाजून 13 मिनिटे
चरण स्पर्श 6 वाजून 15 मिनिटे
कमरेपासून किरीट 6 वाजून 18 मिनटे (Beginning of Ambabai Kirnotsava of Kolhapur, devotees will be able to experience the festival for the next two days)
इतर बातम्या
आधी रेनॉल्ट डस्टरची काच फोडली, मग शंभर शंभरचे बंडल लंपास केले! नांदेडमध्ये चोरांचा सुळसुळाट
चंद्रपूर : जीव धोक्यात घालून वाघांचे छायाचित्र; ‘त्या’ छायाचित्रकारांवर वनविभागाकडून कारवाईचा इशारा