अहमदगर : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. नेवासा येथे वीज तोडणीविरोधात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत होते. मात्र मागणी मान्य होत नसल्यामुळे मुरकुटे यांनी हे पाऊल उचलले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अहमदनगरात कृषीपंप वीज तोडणीविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली असून नेवासा येथे वीज वितरण कार्यालयाच्या परिसरात आंदोलन सुरु आहे. कृषीपंपांची वीज तोडण्यात येऊ नये अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. या आंदोलनात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीदेखील सहभाग घेतला होता. मात्र आंदोलन करुनदेखील मागण्या मान्य होत नसल्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा धारण केला. त्यानंतर मुरकुटे यांनी नेवासा वीज वितरण कार्यालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पाहा व्हिडीओ :
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मतदारसंघातच हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुरकुटे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना इतर लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या मुरकुटे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, वीजतोडणी करु नये या मागणीसाठी एका माजी आमदाराने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यामुळे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
इतर बातम्या :