“BDO ला संरक्षण दिलं तरी फटकवणारच”, अनिल बोंडे यांचा पुनरुच्चार

| Updated on: Nov 03, 2021 | 4:35 PM

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळ्या वळणार गेलं आहे.

BDO ला संरक्षण दिलं तरी फटकवणारच, अनिल बोंडे यांचा पुनरुच्चार
अनिल बोंडे
Follow us on

अमरावती: जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळ्या वळणार गेलं आहे. अधिकारी मृत्यू प्रकरणात तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू, अस वक्तव्य भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केले होते. अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी टीका केली होती. यासंदर्भात बोंडे यांना विचारलं असता बीडीओला संरक्षण दिलं तरी फटकवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय.

बीडीओ वसुली करणारा वाझे, बोंडेंची टीका

अनिल बोंडे यांना वादग्रस्त वक्तव्याबद्दल विचारलं असता अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बीडीओला पोलीस संरक्षण द्यावं तरी पण बीडीओला फटकवणारचं असा पुन्हा पुनरुच्चार बोंडे यांनी केला. फाईल मागे 5 हजार रुपये वसुली करणारा बीडीओ भ्रष्टाचारी असून तो वाझे आहे, असा आरोप बोंडे यांनी बीडीओवर केलाय.पालकमंत्री ठाकूर यांनी मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी सांत्वन भेट दिली नाही, असंही अनिल बोंडे म्हणाले.

अनिल बोंडे यांचं वक्तव्य चिथावणीखोर, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

अनिल बोंडे यांच व्यक्तव्य चिथावणीखोर आहे त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतले पाहिजे. बीडीओ जाधव यांच्यावर बोंडे यांनी हात जरी उगारला तरी प्रत्युत्तर दिल्याशिवाय सोडणार नाही, असं आव्हान सामाजिक कार्यकर्ते सागर भवते यांनी दिली

अधिकाऱ्यांना धमकी खपवून घेणार नाही, यशोमती ठाकूर यांची भूमिका

अनिल बोंडे यांचं वक्तव्य चुकीचं आहे. ते त्यांच्या पक्षाची संस्कृती काय आहे ते दाखवत आहेत. मागासवर्गीय समाजाचा अधिकारी तिथे आहेय. बोंडे अरेरावी करत असतील तर आम्ही तसं होऊ देणार नाही. या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे. अनिल बोंडे यांनी सांभाळून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. या प्रकरणातील जो अधिकारी होता तो सस्पेंड झाला होता, तो अरेरावीची भाषा करत होता. त्यांचं अपघाती निधन झालं ते दुर्दैवी आहे. मात्र, अधिकाऱ्यांना धमकी देणं खपवून घेतलं जाणार नाही, असं अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

इतर बातम्या:


नगरविकास विभागाच्या मनमानीमुळं नगर पालिका, महापालिकांच्या निवडणुका लांबल्या, राजू पाटील यांची टीका

…अन्यथा गटविकास अधिकाऱ्याला फटके मारु, अनिल बोंडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

BJP Leader Anil Bonde repeat controversial statement giving threat to BDO said he will beat officer if Collector not take action against him