उर्फीनं सांगितलं तोकडे कपडे घालण्याचं कारण, आता चित्रा वाघ म्हणतात, सगळ्या ॲलर्जीवर…

| Updated on: Jan 09, 2023 | 11:34 AM

विकृतीला हद्दपार करा. राजकारण करण्यासाठी ज्यांनी उड्या मारल्या त्यांना आम्ही गूळ खोबरे देऊन बोलावले नव्हते, असा टोला त्यांनी लगावला. सुप्रियाताई ही विकृती थांबण्यास सांगत आहेत.

उर्फीनं सांगितलं तोकडे कपडे घालण्याचं कारण, आता चित्रा वाघ म्हणतात, सगळ्या ॲलर्जीवर...
उर्फीनं सांगितलं तोकडे कपडे घालण्याचं कारण, आता चित्रा वाघ म्हणतात, सगळ्या ॲलर्जीवर...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर: मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबता थांबताना दिसत नाही. उर्फीने तोकडे कपडे का घालते? याचं कारण सांगितलं. पूर्ण कपडे घातल्याने आपल्याल ॲलर्जी होते. अंगावर पुरळ येतात असं तिने म्हटलं होतं. त्यासाठी तिने फोटोही शेअर केले होते. मात्र, त्यावरून चित्रा वाघ यांनी उर्फीला चांगलेच फटकारले आहे. आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू, असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला आहे. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उर्फीला फटकारलं. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वैराचार नाही. फॅशन व नांगनाच यात फरक आहे. ऐकलं तर ठीक. नाही तर आम्ही सगळ्या अलर्जीवर उपचार करू, असा इशारा देतानाच नागडी उगडी फिरते तिच्यावर कारवाई नाही. मात्र मला नोटीस पाठवली गेली, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

हे सुद्धा वाचा

एका आईने मला एसएमस पाठवला होता. त्यामुळे मी उर्फी विषयावर बोलले. मुली कोणाचा आदर्श घेणार? महाराष्ट्रात हे चालणार नाही. आधी कपडे घाला. मग ठरवा, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली. चाकणकर तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारात सोडवा. अभ्यास… अभ्यास करू नका. मीही यापूर्वी आयोगावर होते. आपण आता आलात. तुम्ही नोटीस दिली त्याला उत्तर दिले आहे. ते उत्तर पण प्रसिद्ध करा. आयोगाला उत्तर दिले रुपाली चाकणकर या व्यक्तीला नाही. आयोग उत्तम काम करीत आहे व्यक्तीवर आक्षेप आहे, असं त्यांनी सांगितलं.

विकृतीला हद्दपार करा. राजकारण करण्यासाठी ज्यांनी उड्या मारल्या त्यांना आम्ही गूळ खोबरे देऊन बोलावले नव्हते, असा टोला त्यांनी लगावला. सुप्रियाताई ही विकृती थांबण्यास सांगत आहेत. त्यांना दिसत नाही का?, असा सवालही त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून त्यांच्याविरोधातील षडयंत्रावर भाष्य केलं आहे. त्यावरही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड यांनी आत्मचिंतन करावे.

महाविकास आघाडी सरकार काळात आमच्यावर किती खोटे गुन्हे दाखल केले. तेव्हा आम्ही काही बोललो नाही. आमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल केले तेव्हा आम्ही आमचा संविधानवर विश्वास आहे हेच सांगत होतो, असं त्या म्हणाल्या.