मुंबई: महाडच्या तळीये गावात दरड कोसळून तब्बल 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीयेमध्ये आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वराती मागून घोडे आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. (bjp leader pravin darekar taunt cm uddhav thackeray to mahad visit)
राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर चिपळूण, कोल्हापूर, सांगली, महाडच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाड दौऱ्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांचा महाडचा दौरा म्हणजे या सरकारचे वराती मागून घोडे आहेत. सरकारने आता तरी जागं व्हावं. सरकारची बेफिकीरी हा चिंतेचा विषय आहे. लोकांना तातडीने मदत मिळणं गरजेचं असून त्यांचं स्थलांतर करणंही गरजेचं आहे, असं दरेकर म्हणाले.
तळीये येथे दुर्घटना घडल्यानंतर मी आणि टीव्ही9चे प्रतिनिधी सर्वात आधी तिथे पोहोचलो. पण शासनाचा एकही प्रतिनिधी घटनास्थळी आला नव्हता. सरकार इतकं निष्क्रिय कसं राहू शकतं, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात कोविड काळात जी दरी होती, ती आता नाहीये. केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करत आहेत. हेलिकॉप्टर सोडण्यात आलं आहे. केंद्राकडून राज्याला पाहिजे ती मदत दिली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून स्वत: पूर आणि दरडग्रस्त भागांचा दौरा करणार आहे. यंत्रणा सक्रिय व्हाव्यात म्हणून आमचा प्रयत्न आहे. लोकांचे जीव वाचले पाहिजेत, हाच आमचा हेतू आहे, असं ते म्हणाले.
साताऱ्याच्या आंबेघरमध्ये मदत न पोहोचणं हे सरकारचं मोठं अपयश आहे. मंत्र्यांनी आंबेघरला गेलं पाहिजे. यंत्रणांना कामाला लावलं पाहिजे. आम्ही तिथे पोहोचलो नसतो तर या झोपलेल्या सरकारला जागही आली नसती, अशी टीकाही त्यांनी केली. (bjp leader pravin darekar taunt cm uddhav thackeray to mahad visit)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 24 July 2021 https://t.co/XCTaoiwSIX #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 24, 2021
संबंधित बातम्या:
महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
(bjp leader pravin darekar taunt cm uddhav thackeray to mahad visit)