राजीनामा देऊन नाराजी कळवली, वेट अँड वॉच नंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय भूकंपाने वर्धा हादरले

| Updated on: Nov 15, 2021 | 11:39 AM

वर्ध्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे यांनी थेट भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राजीनामा देऊन नाराजी कळवली, वेट अँड वॉच नंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय भूकंपाने वर्धा हादरले
dr. shirish gode
Follow us on

वर्धा: वर्ध्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे यांनी थेट भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे वर्ध्यातील या राजकीय भूकंपाने भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर जिल्ह्यातील काँग्रेसचं बळ वाढलं आहे.

काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान वर्धा जिल्ह्यात भाजपला जबर धक्का बसलाय. काँग्रेसच्या प्रभातफेरीनंतर सकाळीच काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे करंजी भोगे येथे आले. त्यानंतर गोडे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.- गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करताच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

अस्वस्थता कळवली, मन वळवण्याचा प्रयत्नही झाला…

राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या डॉक्टर शिरीष गोडे यांनी 2008 मध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. मागील काही दिवसांपासून गोडे भाजपच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते. भाजपची शेतकरी विरोधी भूमिका आणि वाढती महागाई यावरून त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामाही पाठवला होता कार्यवाहीच आश्वासन मिळाल्यानतर गोडे यांनी वेट अँड वॉच केलं. या कालावधीत गोडे यांच मन वळवण्याचा प्रयत्न झाला. पण बदल दिसत नसल्याचं सांगत अखेर डॉक्टर गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे महासचिव केसी वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

कंटाळलो आणि राजीनामा दिला

गोडे हे दोनवेळा भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. आताही त्यांच्याकडे भाजपचं जिल्हाध्यक्षपद होतं. भाजपची ध्येयधोरणं बदलली, पक्षाच्या आणि नेत्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल झाला. जुना पक्ष राहिला नाही. यामुळे सहा महिन्यापासून व्यथित होतो वरिष्ठांना माहिती दिली पण कारवाई केली नाही. जनतेविरोधी, शेतकरी विरोधी धोरण राबवली जात आहेत. शेतकरी विरोधी भूमिका घेतली जात आहे. त्याला कंटाळून राजीनामा दिल्याचं डॉक्टर गोडे यांनी सांगितलं.

गोडेंना योग्य जबाबदारी देऊ

भाजपने बहुजन समाज आणि संविधानाची चेष्टा करण्याचं पाप केलं आहे. त्यांचं हे पाप आम्ही जनतेसमोर मांडू. तसेच सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास आहे, असं सांगतानाच गोडे यांना योग्य जबाबदारी देणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही काय?; शरद पवारांचं पहिल्यांदाच थेट उत्तर

प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर, काँग्रेसची घोषणा

शिवशाहीर पुरंदरे यांनी छत्रपतींच्या इतिहासाठी आयुष्य खर्ची घातलं, पण त्यात काही वादग्रस्त मुद्दे, शरद पवारांची प्रतिक्रिया