अमित देशमुख यांना भाजपची ऑफर म्हणजे,… जयंत पाटील नेमकं काय म्हणाले

| Updated on: Jan 12, 2023 | 10:17 PM

नाशिकची जागा काँग्रेसने लढवायची असे ठरले आहे. काँग्रेस उमेदवाराकडून अर्ज दाखल केलेला आहे. काँग्रेस नेत्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ. का

अमित देशमुख यांना भाजपची ऑफर म्हणजे,... जयंत पाटील नेमकं काय म्हणाले
जयंत पाटील
Follow us on

सांगली : अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना भाजपमध्ये येण्यासाठी भाजपकडून ऑफर दिली जाते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे.  भाजप पक्ष सामर्थ्यवान नाही. त्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ते सांगली मध्ये बोलत होते. तर, लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली आणि कितीही संकटे आली तरी आहे  तिथेच राहणार. भाजपात जाण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांचे विटा मधील कार्यक्रमात हे वक्तव्य केलंय.

सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे. तसे तूर्त  तरी म्हणावे लागतेय. हे सरकार वैध की अवैध हे सर्वोच्य न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. आता कोर्ट  सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता राखा. आताची पाच वर्षे ही चमत्कारिकच राहिलीत, असा टोला अमित देशमुख यांनी राज्य सरकारला लगावला.

 

एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवस…

जयंत पाटील म्हणाले, हसन मुश्रीफ या ज्येष्ठ नेत्यांवर ईडीने छापा टाकला. मात्र त्यात काहीच मिळालं नाही.  जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम आहे. यापूर्वी इन्कम टॅक्सने छापा टाकला होता. पण काहीच मिळाले नाही.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार थांबलेले आहे. यावर ते म्हणाले हे सरकार गतिमान आहे. थोडे दिवस थांबावे.  एसटी कर्मचाऱ्यांनी सहन करावे असे मला वाटते.

 

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर

 

मिरजेत भाजपा आमदाराच्या भावानं केलेला प्रकार हा प्रशासनाला हाताशी धरूनच. मिरजेतील पाडकाम प्रकरणात पोलीस प्रशासकीय अधिकारी सामील असल्याचा जयंत पाटलांचा आरोप आहे. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा जयंत पाटील यांनी घणाघात केला.

 

 

पंतप्रधान मोदी यांची स्वामी विवेकानंद यांच्याशी तुलना केली. त्यात आक्षेप घेण्यासारखे काय असे स्पष्ट करीत मोदींकडे सुद्धा चांगले गुण आहेत. असे म्हणत जयंत पाटील यांच्याकडून स्वामींबरोबर मोदींच्या केलेल्या तुलनेने एक प्रकारे समर्थन केले.

 

 

नाशिकची जागा काँग्रेससाठी

 

नाशिकची जागा काँग्रेसने लढवायची असे ठरले आहे. काँग्रेस उमेदवाराकडून अर्ज दाखल केलेला आहे. काँग्रेस नेत्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ. काँग्रेसने याबाबत आम्हाला काहीही कल्पना दिलेली नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.