Buldana house | बुलडाण्यात घराचे बांधकाम करणे महाग; साहित्याचे भाव वाढल्याचा परिणाम

| Updated on: May 13, 2022 | 4:57 PM

टाळेबंदीपूर्वी अनेक प्रकल्प प्रस्तावित होते. या शिवाय नागरिकांनी आपले खाजगी घरे ही बांधकाम सुरुवात केलीय. परंतु कोरोनामुळे सध्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम खर्चही वाढलाय. अशा परिस्थितीत त्याच दराने घराची विक्री करणे विकासकांना शक्य नाही.

Buldana house | बुलडाण्यात घराचे बांधकाम करणे महाग; साहित्याचे भाव वाढल्याचा परिणाम
बुलडाण्यात घराचे बांधकाम करणे महाग
Follow us on

बुलडाणा : कोरोना विषाणूच्या (corona virus) वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदी तसेच संचारबंदीमुळे (Curfew) सर्वच क्षेत्रांना फटका बसलाय. यामध्ये बांधकाम उद्योग (construction costs) ही सुटलेला नाही. सिमेंट, वाळू, वीट, स्टीलसह आदी साहित्याच्या किमती भरमसाठ वाढल्याने बांधकाम खर्चही वाढलाय. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे बजेट पुरते कोलमडले आहे. 2016 मध्ये नोटबंदी झाल्यापासून ते आजवर विविध कारणांमुळे बांधकाम उद्योगावर मंदीचे सावट आहे. टाळेबंदीनंतर ही वाढ 10 ते 12 टक्के इतकी आहे. तर स्टीलच्या दरात सर्वाधिक 15 ते 20 टक्के वाढ झालीय. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. सुरू असलेले अनेक प्रकल्प बंद पडले आहेत.

दगडखाणी बंद

टाळेबंदीपूर्वी अनेक प्रकल्प प्रस्तावित होते. या शिवाय नागरिकांनी आपले खाजगी घरे ही बांधकाम सुरुवात केलीय. परंतु कोरोनामुळे सध्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम खर्चही वाढलाय. अशा परिस्थितीत त्याच दराने घराची विक्री करणे विकासकांना शक्य नाही. अनेकांनी ग्राहकांकडे जास्त रकमेची मागणी केल्याची उदाहरणे आहेत. टाळेबंदीच्या काळात वाहतूक बंद होती. त्यामुळे इतर राज्यांतून पुरेसा कच्चा माल उपलब्ध झाला नाही. सरकारची परवानगी नसल्यामुळे मागील काही वर्षांपासून दगडखाणी बंद आहेत. त्यामुळे खडी, गिट्टी, दगडी, आदी पुरवठाही कमी झाला आहे.

कच्च्या मालाचे उत्पादन घटले

यातच किमती वाढल्याने अनेक व्यावसायिकांनी कच्च्या मालाचा मर्यादित साठा करून ठेवला आहे. यामुळे बांधकाम व्यवसायिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळात वाहतूक यंत्रणाही बंद होत्या. त्या काळात मजुरांनी घरचा रस्ता धरल्याने बांधकाम साहित्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. आता अनलॉकमध्येही पुरेसे मजूर उपलब्ध नाहीत. त्यामुळे कच्च्या मालाचे उत्पादन घटले आहे. जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून लोखंडाच्या दरात सतत वाढ होत आहे. 5 हजार 500 रुपये दराने विकले जाणारे लोखंडाचे भाव आता गगनाला भिडले आहेत. 7 हजार 300 रुपयांचा टप्पा लोखंडाच्या दराने गाठला आहे. यामुळे बांधकाम धारकांमध्ये नैराश्य आल्याचे व्यापारी उज्वल गोयनका यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा