बुलडाणा : देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही अंशी अनलॉक करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. (Buldana district health department ready For Corona third Wave)
बुलडाणा जिल्हा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये होणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्हा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले आहे.
बेडच्या संख्येत दुपटीने वाढ
या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील बेडमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत बुलडाण्यात जवळपास साडेपाच हजार बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासोबतच बुलडाणा, खामगाव , शेगाव , मलकापूर आणि देऊळगाव राजा या पाच ठिकाणी लहान मुलांसाठी स्वतंत्र्य बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी तज्ञ डॉक्टर, साहित्य आणि औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ऑक्सिजनच्या 8 जनरेशन प्लँटची उभारणी
बुलडाणा जिल्ह्यात ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी ऑक्सिजनचे 8 जनरेशन प्लँट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्हा हा सर्वच बाबतीत परिपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र शासनाने सांगितलेल्या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शस्त्रक्रिया करत असतानाच डॉक्टरला हृदयविकाराचा झटका, औरंगाबाद हळहळलेhttps://t.co/j0WfeiYJeK#Aurangabad #Doctor #HeartAttack
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 27, 2021
(Buldana district health department ready For Corona third Wave)
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अहमदनगर सज्ज, वीकेंड लॉकडाऊन लागू, नवी नियमावली काय?