बंदी असूनही साताऱ्यात बैलगाडा शर्यतीचा धुराळा, लाखो रुपयांची उलाढाल, प्रशासन हातावर हात ठेऊन गप्प!

| Updated on: Aug 02, 2021 | 9:17 AM

राज्यात बैलगाडी शर्यतींवर (Bullock Cart Race) बंदी आहे. तरी सुद्धा सातारा जिल्ह्यातील मायणी परिसरात सध्या बैलगाडी शर्यतींचा अक्षरशः धुराळा उडाला आहे.

बंदी असूनही साताऱ्यात बैलगाडा शर्यतीचा धुराळा, लाखो रुपयांची उलाढाल, प्रशासन हातावर हात ठेऊन गप्प!
साताऱ्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन
Follow us on

सातारा : राज्यात बैलगाडी शर्यतींवर (Bullock Cart Race) बंदी आहे. तरी सुद्धा सातारा जिल्ह्यातील मायणी परिसरात सध्या बैलगाडी शर्यतींचा अक्षरशः धुराळा उडाला आहे. या शर्यतींवर बंदी असूनसुद्धा शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये या शर्यती पार पडत आहेत. प्रशासन मात्र हातावर हात ठेऊन गप्प आहे.

बैलगाडा शर्यतीवर बंदी तरी साताऱ्यात धुराळा

राज्यावर कोरोनाचं संकट सुरु आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. राज्यातल्या अनेक शहरांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत. साताऱ्यात तर कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. मात्र, अशाही काळात सातारकरांना कोरोनाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाहीय. सर्व नियमांना धुडकावून साताऱ्यात बैल गाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं. विशेष म्हणजे बैल गाडी शर्यतीला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीदेखील ही शर्यत आयोजित करण्यात आली.

बंदी असूनही शर्यतींचा धुराळा, लाखो रुपयांची उलाढाल, प्रशासन ढिम्म

या बैलगाडा शर्यतींमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असताना प्रशासन मात्र आजून ढिम्मच आहे. एकीकडे सामान्य जनता लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळत असताना दुसरीकडे अशा शर्यतींच्या माध्यमातून शेकडो लोकं एकत्र येऊन सर्व नियम पायदळी तुडवत आहेत.

शर्यतीत भाग घेण्यासाठी गर्दी, बघ्यांची लगबग, कोरोना नियमांना हरताळ

मायनीनजीक या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं गेलं होतं.  या दरम्यान मोठ्या प्रमाणात या शर्यतीत भाग घेण्यासाठी आणि शर्यत बघण्यासाठी अनेक लोक जमले होते. अनेक तास ही शर्यत सुरु होती.

पोलिसांचा कानाडोळा का?

बैल गाडीच्या शर्यतीवर न्यायालयाची बंदी घातली आहे. शिवाय साताऱ्यात निर्बंध असल्याने विनाकारण नागरिक घराबाहेर फिरु शकत नाहीत. पण याठिकाणी कोरोना नियमांना हरताळ फासून लोक शर्यतीचा आनंद घेत होते. विशेष म्हणजे इतकं सारं घडत असताना पोलिसांनी मात्र या साऱ्या प्रकारावर कोणतीही कारवाई केली नाही. मायणी पोलीस ठाण्यापासून अवघ्या 5 किमी अंतरावर पार पडणाऱ्या या शर्यतींचाकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(Bullock Cart Race Orgnize in Mayani Satara)

हे ही वाचा :

लॉकडाऊनचे नियम धुडकावले, हजारोंच्या संख्येने गर्दी जमवून बैल गाडी शर्यत